Girish Mahajan News: जळगाव जिल्ह्यातील दोन माजी मंत्री आणि चार माजी आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे अजित पवार खुशीत आहेत. मात्र हा आनंद अल्पकाळ टिकतो की काय अशी स्थिती आहे.
माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील आणि तीन माजी आमदार यांनी शनिवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर लगेचच पक्षांतरासाठी अन्य पक्षांचे दरवाजे ठोठावले होते. मात्र त्यांना प्रवेश देण्यात भाजपने उत्सुकता दाखवली नव्हती.
आता या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश या कारणानेच वादाचा विषय ठरला आहे. यासंदर्भात जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावले होते. आता भाजपनेते गिरीश महाजन यांनी याबाबत स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार आहे या सरकारकडे मोठे बहुमत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे अनेक नेते महायुतीच्या आणि विशेषत: भाजपच्या प्रवेशासाठी उत्सुक आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची झालेल्या चर्चेत कोणत्याही पक्षात प्रवेश देताना काही निकष निश्चित करण्यात आले होते.
ज्या नेत्याने महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध विधानसभेत उमेदवारी केली त्याला प्रवेश देऊ नये, असे ठरले होते. जळगावच्या दोन्ही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी केली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे या नेत्यांना भाजप तसेच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या नेत्यांचा महायुतीत प्रवेश देण्यास प्रखर विरोध होता. त्यामुळेच हे नेते गेली सहा महिने सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करीत होते.
या संदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट टीकेचे लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, राज्यात महायुतीकडे प्रबळ बहुमत आहे अशा स्थितीत कोणत्याही विरोधी पक्षातील अथवा अन्य नेत्यांची सरकारमध्ये गरज नाही.
यापूर्वी हेच नेते भाजपामध्ये प्रवेश करण्यास उत्सुक होते. शिवसेना शिंदे पक्षाने विरोध केल्याने आम्ही ते थांबवले. सत्ताधारी पक्षांनी नेत्यांना प्रवेश देताना त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचे राजकीय चारित्र्य विचारात घेऊनच प्रवेश देण्याचे ठरले होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी या संकेतांचा भंग केला आहे. आता भाजप देखील याबाबत प्रवेश देण्यास स्वतंत्र आहे, असा इशार आहे त्यांनी दिला आहे.
एकंदरच जळगाव जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे या पक्षाला जळगाव मध्ये विस्ताराला अनुकूल वातावरण निर्माण होईल हे समाधान होते. मात्र हे समाधान फार काळ टिकले नाही असे सध्याचे चित्र आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.