Sanjay Raut, Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : गिरीश महाजनांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज; 'लोकसभेत एक तरी...'

Sunil Balasaheb Dhumal

Jalgaon Political News : लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे तशी भाजपसह महायुती आघाडी अधिकच आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. महायुतीतील घटकपक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांत मनोमिलन घडवून आणण्यासाठी जिल्हास्तरावर मेळावे घेण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडीतही निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मंत्री गिरीश महाजनांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठे चॅलेंज दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आठवड्यातच दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वातावरणनिर्मितीसाठीच मोदी वारंवार राज्यात येत असल्याची टीका विरोधकांनी केली. भाजपला लोकसभेत फटका बसणार असल्याचा सर्व्हे प्रसिद्ध झाला होता. त्यामुळेच मोदींचा सोलापूर दौरा होत असल्याची टीका ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावर भाजपनेते, मंत्री महाजनांनी ठाकरेंना आव्हानच दिले. 'ठाकरेंनी किमान राज्यभर फिरून लोकसभेची एक तरी जागा निवडून दाखवावी,' असे चॅलेंजच महाजनांनी दिले.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली. मोदींनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींचा धसका घेतला आहे. यातूनच मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. जिथे राजकीय फायदा दिसतो तिथेच मोदी जातात. मणिपूरला लोकसभेच्या दोन-तीन जागा असल्यानेच ते एकदाही तिकडे गेले नाहीत, असा थेट आरोप राऊतांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८०, त्यानंतर महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. त्यामुळे या दोन राज्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोळा आहे. त्यांनी मणिपूरला, काश्मीर खोऱ्यात, म्यानमारच्या सीमेवर, लडाखला जायला पाहिजे. लक्षद्वीपला जाऊन मालदीवशी भांडण करून राजकारण केले, अशी टीकाही राऊतांनी केली आहे.

यावर महाजन (Girish Mahajan) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगन्मान्य नेते आहेत. त्यामुळेच संजय राऊतांच्या पोटात शूळ उठत आहे. आता राऊतांनी आपले नेते उद्धव ठाकरे यांना घेऊन देशभर फिरावे. किमान राज्यभर फिरवून लोकसभेची एक जागा निवडून दाखवावी. निवडणुका जिंकायच्या असतील तर राऊतांनी वायफळ बडबड बंद करावी. त्यांनी आपल्या नेत्यांना लोकांमध्ये घेऊन जावे. त्यानंतरच त्यांना कळेल, की त्यांच्या पाठीशी किती जनता आहे, असा टोलाही महाजनांनी लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT