Modi Solapur Tour : मोदींनी उडवली काँग्रेसच्या निवडणूक घोषणेची खिल्ली... ‘क्यों, आधी रोटी खाएंगे...’

RAY Nagar News : आमचं सरकार हे गरिबांसाठी समर्पित आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : आपल्या देशात अनेक वर्षे ‘गरिबी हटाव’च्या घोषणा देण्यात आल्या. पण, देशातील गरिबी काही हटली नाही. ‘आधी रोटी खाएंगे...,’ असं सांगितलं जायचं. क्यों भाई...? ‘आधी रोटी खाएंगे और तुमको वोट देंगे..’ असे काही लोक बोलत होते. ‘क्यों, आधी रोटी खाएंगे... मोदी है पुरी खाएंगे’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या १९८० मधील निवडणूक घोषणेची खिल्ली उडवली. (Narendra Modi mocked Congress's election announcement)

सोलापूरमधील कुंभारीच्या रे-नगर येथे देशातील सर्वांत मोठ्या गृहप्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (ता. १९ जानेवारी) करण्यात आले. कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्या कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी काँग्रेसच्या घोषणेवर भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Sangola Politics : ‘आम्हा दोन भावंडांत काहीजण कैकयीप्रमाणे भांडण लावत आहेत...’ : डॉ. देशमुखांचा रोख कुणाकडे

देशात १९८० मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्या निवडणुकीत काँग्रेसने प्रचारासाठी काही घोषणा बनवल्या होत्या. त्यात ‘आधी रोटी खाएंगे, इंदिराजी को लाएंगे’ या घोषणेचा समावेश हेाता. काँग्रेसने इंदिरा गांधी यांच्या लोकप्रियतेचा वापर खुबीने करण्याचा निर्णय घेतला हेाता. त्यात ‘इंदिरा लाओ, देश बचाओ’, ‘आधी रोटी खाएंगे...इंदिराजी को लाएंगे’ या घोषणांचा समावेश होता. त्या घोषणांची मोदी यांनी सोलापुरात कामगारांना घरेवाटपाच्या कार्यक्रमात खिल्ली उडवली.

अर्धी भाकरी का खायची?, असा सवाल करून मोदी यांनी ‘मोदी आहे, त्यामुळे संपूर्ण एक भाकरी खायची,’ असे सांगून देशात आता कोणीही उपाशी राहत नाही. हाच आमच्यात आणि विरोधकांमध्ये फरक आहे, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी भाषणात केला. घरे, शौचालयाअभावी गरिबांचा पावलोपावली अपमान होत होता. आम्ही पाच कोटी शौचालये बांधली आणि गरिबांचा अपमान होणे बंद झाले, असा दावाही मोदी यांनी केला.

Narendra Modi
PM Modi Solapur Visit : देशवासियांनो, २२ जानेवारीला सायंकाळी रामज्योती प्रज्वलित करा; मोदींचे आवाहन

‘आमचं सरकार हे गरिबांसाठी समर्पित आहे. आमच्या सरकारने पाच कोटींहून अधिक शौचालये बांधली आहेत. आत्मनिर्भर, श्रमिक कामगारांचा सन्मान हाच आमचा मार्ग आहे. तुमची स्वप्नं पूर्ण करणे, हीच मोदी यांची गॅरंटी आहे. छोटी स्वप्नं बघू नका, मोठी स्वप्नं बघा,’ असे आवाहनही मोदी यांनी देशवासीयांना केले.

R...

Narendra Modi
Modi Solapur Tour : कामगारांना घरे देताना मोदी बालपणीच्या आठवणीने भावूक; सोलापुरात रडले....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com