Girish Mahajan, Chhagan Bhujbal, Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : भुजबळांचे भाषण होण्याआधीच महाजनांनी साधली संधी; एक वक्तव्य अन् सभागृहात पिकला हशा, नेमकं काय घडलं?

Girish Mahajan On Chhagan Bhujbal : गिरीश महाजन हे मूळचे जळगाव जिल्ह्याचे असले तरी ते नाशिकचे पालकमंत्री आहेत. त्यावरुन नेहमी महाजनांना बाहेरच्या जिल्ह्यातील नेता म्हणून संबोधले जात असते. त्यावरुन महाजनांनी भुजबळांना मिश्लिकल टोला लगावला.

Ganesh Sonawane

Nashik Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शुक्रवारी (दि. 28) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील मौजे चाचडगाव येथील कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले.

या कार्यक्रमाला नाशिकचे नवनिर्वाचित पालकमंत्री तथा कुंभमेळा गिरीश महाजन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हेही उपस्थितीत होते. या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी केलेल्या मिश्किल टोलेबाजीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मविप्रच्या मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्न होता. या जागेचा करार संपला होता. त्यासंदर्भात अॅड. नितीन ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती. त्यावर बोलताना महाजन म्हणाले, मी ठाकरेंना आधीच सांगितलं होतं. की काही अडचण येणार नाही. मुख्यमंत्र्यांचे हात मोकळे आहेत. शिक्षणासाठी जी मदत लागेल ती मदत ते करतील. मुख्यमंत्र्यांनी त्यावर मार्ग देखील काढला. एक रुपयात त्यांनी संस्थेला 50 एकर जमीन दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे कुठलाही लवलेश किंवा राजकारण नाही.

मी देखील पालकमंत्री म्हणून काम करतोय. जरी मी या जिल्ह्याचा नसेल तरी वारंवार सांगतोय की, तुम्ही माझ्या कामाकडे बघा. मी बाहेरच्या जिल्ह्याचा (जळगावचा) आहे असं म्हणून माझ्याकडे बघू नका, बरका भुजबळ साहेब... असे त्यांनी म्हटले. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केल्याचे पाहायला मिळाले.

पुढे बोलताना महाजन म्हणाले की, मला माहिती नाही यानंतर भुजबळ साहेबांचे भाषण आहे की नाही, भाषण असेल तर ते मला टोमणा मारणारच आहेत. पण असं वाटंत की आता आगामी येणारा कुंभमेळा हा तुमचा-आमचा सर्वांचा आहे, तो केवळ प्रशासकीय नसून सर्वांनी यात हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या मनोगतात मविप्र संस्थेच्या कार्याचा गौरव केला. मविप्र संस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाली असून, लाखो विद्यार्थ्यांनी येथून शिक्षण घेतले आहे. तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत या संस्थेचा मोठा सहभाग असून, ही संस्था अत्यंत झपाट्याने पुढे जात आहे. आता कृषी क्षेत्रात आपण चांगली सुरवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT