Nashik Kumbh Mela : कुंभमेळा आयुक्त फोन उचलत नाहीत! भाजप शहराध्यक्षांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Sunil Kedar, Devendra Fadnavis, Kumbh Mela Commissioner, Kumbh Mela coordination : सिंहस्थ तयारी बैठकीत अधिकारी गैरहजर, व्यवस्था कोलमडली; भाजप शहराध्यक्ष सुनील केदार संतप्त, कुंभमेळा आयुक्तांविरोधात लेखी तक्रार.
CM Devendra Fadnavis, IAS Shekhar Singh
CM Devendra Fadnavis, IAS Shekhar Singh Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण व लोकप्रतिनिधी यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आता भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याने प्राधिकरण व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा असलेला अभाव उघड उघड चव्हाट्यावर आला आहे.

महापालिका आणि सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने मंगळवारी सिंहस्थाच्या विविध कामांचे सविस्तर सादरीकरण नगरसेवकांसमोर केले जाणार होते. त्यासाठी पंचवटीतील सदाशिव भोरे नाट्यगृहात सायंकाळी साडेपाच वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. नगरसेवकांना ऐनवेळी सकाळी पत्र देण्यात आलं. त्यानंतर लोकप्रतिनिधी वेळेपूर्वी सभागृहात दाखल झाले. मात्र तेथे वेळेवर ना अधिकारी होते, ना खूर्च्या, ना ध्वनिक्षेपकाची व्यवस्था‌.

तब्बल तासभर नगरसेवक रिकाम्या सभागृहात प्रतीक्षा करीत राहिले. नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करण्यात आला, मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याचा आरोप करण्यात आला. अखेर सायंकाळी सहा वाजता 55 हून अधिक नगरसेवकांनी संतप्त होऊन सभात्याग केला. दरम्यान , नगरसेवकांनी या संदर्भात भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना माहिती दिली.

CM Devendra Fadnavis, IAS Shekhar Singh
Maharashtra IPS officers : महाराष्ट्राला मिळाले 12 नवे IPS अधिकारी; उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती

मी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांना फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही. यापूर्वीही अनेक वेळा मी संपर्क केला, मेसेज केले पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हे योग्य नाही, असं शहराध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटलं आहे. त्यांनी हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांना सांगितला असून कुंभमेळा आयुक्तांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सुनील केदार यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे.

नाशिकचा इतिहास भुगोल बाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांपेक्षा नाशिककर व लोकप्रतिनिधी यांना जास्त व पुर्ण माहिती आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या सूचना गांभीर्याने विचारात घेतल्याच पाहिजे, असं सुनिल केदार यांनी म्हटलं आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नाही तर कुंभ कसा होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे‌. मुख्यमंत्री नाशिकमध्ये आल्यानंतर देखील आपण या संदर्भात त्यांच्याशी बोलणार असल्याचं केदार यांनी सांगितलं.

CM Devendra Fadnavis, IAS Shekhar Singh
तब्बल अर्धा कोटी फॉलोअर्स, पण तुकाराम मुंढे सोशल मीडियात एकाच नेत्याला करतात फॉलो...

उशिरा जाग...

नगरसेवक सभागृहातून बाहेर पडल्यानंतर प्रशासनाला जाग आली. महापालिका आयुक्त मनीषा खत्री, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापौर हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर विलास शिंदे सभागृहात दाखल झाले. मात्र तोपर्यंत बहुतांश नगरसेवकांनी सभात्याग केला होता. उशीर झाल्याने कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र या प्रकाराची नाशिकचे राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com