Girish-Mahajan-On-Uddhav-Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: उद्धव ठाकरे यांनीच ठाकरे ब्रँड संपवला; गिरीश महाजनांनी सुनावले

Girish Mahajan criticize Shivsena, uddhav Thackrey finished Thackrey brand, Mumbai Mayor will be of BJP-भाजपला सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना आता कोणीही विचारायला तयार नाही, असा दावा गिरीश महाजन यांनी केला.

Sampat Devgire

BJP Vs Shivsena UBT News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड संपला असे म्हटले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्याचे समर्थन केले आहे. येत्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे संपलेली दिसेल, असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड आता संपला, असे म्हटले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्याला समर्थन दिले. येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कोणीही राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनीच ठाकरे ब्रँड संपवला, असे म्हटले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. नाशिकमध्ये त्यांनी मोठा मोर्चा काढला. त्याची देखील मंत्री महाजन यांनी खिल्ली उडवली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता कोणीही राहिलेले नाही. याची जाणीव सगळ्यांना झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत देखील एक दोन जागांचा फरक वगळता भाजप आघाडीवर होते. काही लोकांचा आम्हाला पाठिंबा होता. आम्ही आमचा महापौर करू शकलो असतो. मात्र आम्ही शिवसेनेला संधी दिली. मुंबईचा आगामी महापौर हा भाजप आणि महायुतीचाच होईल.

जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भाजपला जनतेची पसंती आहे, असा दावा महाजन यांनी केला. विधानसभा गेल्या निवडणुकीत शिवसेना भाजप बरोबर निवडणुकीला सामोरी गेली. त्यानंतर मात्र त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली होती. त्याचा फटका त्यांना बसला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कृती सामान्य जनतेच्या मनातली भावना होती. त्यामुळे तो एक ब्रँड होता. हा ब्रँड आता राहिलेला नाही. ठाकरे ब्रँडचा केव्हाच बँड झाला आहे. हा ब्रँड संपवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले.

उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडले. आता ते कधी काँग्रेस कधी राष्ट्रवादी तर कधी हिरवा झेंडा हाती घेतात. त्यामुळेच निवडणुकीत जनतेने त्यांना उत्तर दिले आहे, या शब्दात मंत्री महाजन यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. येत्या निवडणुकीत हे चित्र स्पष्ट होईल असा दावाही त्यांनी केला.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT