NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकला शक्तीप्रदर्शन; शरद पवारांच्या धोरणी खेळीने कोणाला भरली धडकी?

Sharad Pawar; why NCP choose Nashik for Meeting, Agriculture issues, NMC elections- नाशिकच्या शिबिराद्वारे ग्रामीण, शेतकरी मतदारांवरील करिश्मयाची शरद पवारांकडून चाचपणी?
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे शिबिर नाशिकला झाले. यानिमित्ताने पक्षाने मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केले. त्यासाठी नाशिकचीच निवड का केली? हा चर्चेचा विषय आहे.

नाशिक हा कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा मानला जातो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा या घटकावर राजकीय प्रभाव राहिला आहे. त्यामुळेच या प्रश्नांची निवड करून शरद पवार यांनी आगामी मोठ्या राजकीय खेळीची तयारी सुरू केली, असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिबिराची आखणी अतिशय काळजीपूर्वक केल्याचे दिसले. शेतकरी, महिला, युवक आणि कांदा व शेतकरी या भोवती सर्व मांडणी होती. प्रभावी ठरली ती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुढे केलेली 'व्होट चोरी' हे सर्व समाज घटकांना आकर्षित करणारे विषय त्यात होते.

Sharad Pawar
Devyani Phrande Politics: आमदार देवयानी फरांदे यांचा आरोप, कुंभमेळ्याच्या कोटींच्या निविदांमुळे विरोधकांचा नाशिककडे ओढा!

उद्धव आणि राज ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शिवसेना मनसेचा मोठा मोर्चा प्रशासनाला हादरवून गेला. त्याचीच पुनरावृत्ती राष्ट्रवादीच्या शेतकरी आक्रोश मोर्चात झाली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप हे मुख्य टारगेट असल्याचा संदेश देण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाला.

Sharad Pawar
Nashik Onion Export Ban: नाशिकचा कांदा थेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गाजला; निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रशासन गतिमान

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोदचे जिल्ह्यातील सर्व १४ आमदार विजयी झाले. त्यानंतर असे यश अन्य कोणालाही मिळाले नाही. तेव्हापासून शरद पवार आणि नाशिक हे एक वेगळे राजकीय समीकरण पुढे आले. त्याची प्रत्येक निवडणुकीत चर्चा होते.

नाशिकला २०१९ च्या निवडणुकीत पवार यांच्या पक्षाचे सर्वाधिक सहा आणदार होते. २०२४ मध्ये या सर्व आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गट निवडला. सध्या अजित पवार यांचे सात आमदार आहेत. शरद पवार यांच्या शक्ती प्रदर्शनाचा सर्वाधिक धसका या सात आमदारांनी घेतल्याचे दिसले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावर नाशिकचे हे शिबिर चर्चेत आहे. यामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर 'आपण विरोधी पक्षात आहोत' या संदेशावर भर होता. सरकार विरोधात मैदानात उतरा. जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करा, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी ठामपणे सांगितले.

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबरोबरच राज्याची राजकीय दिशा आणि दशा विरोधी पक्षांना अनुकूल ठरेल अशीच आहे. नाशिकचा मोर्चा हा राज्य शासनाला आव्हान देण्यासाठी मुंबईत होणाऱ्या शक्ती प्रदर्शनाचे बिजारोपण होते. त्यात कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि महिला, युवकांचे प्रश्न परडारवर आहेत. त्यासाठी नाशिकची विचारपूर्वक निवड पक्षाने केली होती, असे शहराध्यक्ष गजानन शेलार म्हणाले.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com