Devyani Phrande Politics: आमदार देवयानी फरांदे यांचा आरोप, कुंभमेळ्याच्या कोटींच्या निविदांमुळे विरोधकांचा नाशिककडे ओढा!

Devyani Phrande; Opposition active for elections, opposition lost faith of public, BJP committed to people?-आमदार फरांदे यांची टीका, महापालिका निवडणुकांमुळेच विरोधक सक्रिय झाले
Devyani Pharande
Devyani PharandeSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs NCP News: गेल्या आठवड्यात शिवसेना आणि मनसेने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही नाशिकला मोर्चा काढला. भाजपला टारगेट करण्यासाठी विरोधकांनी जोर लावला आहे.

विरोधी पक्षांच्या सक्रियतेवर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विरोधी पक्ष आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमुळे सक्रिय झाला आहे. जनतेशी कोणतीही बांधिलकी राहिली नसल्याने ते धावपळ करीत आहेत.

नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. पाच ते सहा हजार कोटींच्या विकास कामांच्या निविदा काढण्यात येणार आहे. या निविदांमुळेच विरोधी पक्ष नाशिककडे आकर्षित झाले आहेत.

Devyani Pharande
Sharad Pawar Politics: शरद पवारांच्या इशाऱ्यानंतर मंत्रिमंडळाची धावपळ; कांदा प्रश्नावर तोडगा निघणार

शिवसेना, मनसे अथवा अन्य विरोधी पक्षांचा विचार केल्यास हे नेते पर्यटनासाठी नाशिकला येतात, असा टोला आमदार फरांदे यांनी लगावला आहे. या पक्षांची जनतेशी नाळ तुटलेली आहे. त्यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.

Devyani Pharande
Nashik Onion Export Ban: नाशिकचा कांदा थेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गाजला; निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रशासन गतिमान

भारतीय जनता पक्ष हा लोकांच्या प्रश्नांवर आणि त्यांच्याशी संपर्क असलेला पक्ष आहे. निवडणुका नसल्या तरीही भाजप लोकांमध्ये जाऊन काम करत असतो. त्यामुळे भाजपला असे उपक्रम करण्याची आवश्यकता नाही.

राज्यातील सरकारने नाशिक शहरासाठी मोठा विकासाचा प्लान केला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात अनेक विकास कामे होतील. त्यांवरच्या खड्ड्यांचा प्रश्न देखील दिवाळीनंतर संपुष्टात येईल. त्यासाठीची तयारी प्रशासनाने केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करीत आहेत. हा विश्वास लोकांमध्ये आहे. त्यामुळेच धास्तावलेले विरोधी पक्ष नाशिकमध्ये मोर्चे काढून वातावरण निर्मितीच प्रयत्न करीत आहेत. त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा दावा आमदार फरांदे यांनी केला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेने जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार देखील सक्रिय झाला आहे. मात्र भाजपच्या नेत्या परांदे यांनी या सर्वच प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे भाजप आणि विरोधकांमध्ये आगामी काळात राजकीय संघर्ष पहायला मिळेल, याचे संकेत आहेत.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com