Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : मी तुमच्या सारख्या चोऱ्या केल्या नाही, महाजन शरद पवार गटातील बड्या नेत्यावर बरसले...

Girish Mahajan slams Eknath Khadse over corruption allegations : गिरीश महाजन व एकनाथ खडसे जिल्ह्यातील हे दोघेही मोठे नेते एकेकाळी एकाच पक्षात (भाजपात) होते. मात्र कालांतराने दोघांमध्ये बिनसले. दोघांकडून नेहमीच एकमेकांवर टोकाची टीका व आरोप होत असतात.

Ganesh Sonawane

Girish Mahajan : गिरीश महाजन व एकनाथ खडसे जिल्ह्यातील हे दोघेही मोठे नेते एकेकाळी एकाच पक्षात (भाजपात) होते. मात्र कालांतराने दोघांमध्ये बिनसले. दोघांकडून नेहमी एकमेकांवर टोकाची टीका व आरोप होत असतात. दोघांमध्ये कायमच शाब्दिक युद्ध रंगत असते. दोघांमधील राजकीय शत्रूत्व दिवसेंदिवस वाढत असून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत.

मी मोठ्या जमीनदाराचा मुलगा असून, माझ्याकडे वडिलोपार्जित भरपूर शेती आहे. त्यांचे वडील साधे शिक्षक असताना ते इतके मोठे कसे झाले, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना उद्देशून उपस्थित केला होता. त्यावरुन गिरीश महाजन व खडसे यांच्यात पुन्हा झुंपली आहे. महाजन यांनी खडसे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

महाजन म्हणाले, माझे वडील शिक्षक होते. त्यांना जाऊन आता २५ वर्षे झाली आहेत. तुम्हाला काय अडचण आहे ? तुमच्याकडे जे चालले आहे ते आधी सावरा. मी कुठे चोऱ्या माऱ्या केलेल्या नाहीत. तुम्ही काय काय केलेलं आहे हे सर्वांना माहित आहे. मी महामार्गावर जागा घ्यायची आणि मुरुम चोराच्या गोष्टी कधीच करत नाही अशी खोचक टीका महाजनांनी केली.

यावेळी खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत देखील महाजन यांनी जहरी टीका केली. जळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भूसंपादनाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय बोलले ते सांगू का सर्वांना? संपूर्ण राज्याला माहिती आहे, की कोण तुरूंगात गेले तसेच कोण चोऱ्या करत आहे. तसेच दिल्लीला जाऊन कोण माफी मागून लोटांगण घालत आहे. या शब्दात महाजनांनी खडसेंना सुनावलं.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. त्यावर विचारले असता महाजन म्हणाले, कौतुक केले आहे तर चांगले आहे, आमचे मुख्यमंत्री फार दिलदार आहेत. त्यांनी त्यांचं कौतुक केलं तर वाईट काय, असे ते म्हणाले.

दरम्यान शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. रोहिणी खडसे यांनी वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील वकील विपुल दुषिंग यांच्याविषयी बोलताना 'जो त्या वकिलाच्या चार कानशिलात लावेल त्याचा मी सत्कार करणार असल्याचे वक्तव्य केलं होतं. त्यावर रोहिणी खडसेंना पक्षाने तसा अधिकार दिलेला दिसतो असा टोला महाजन यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT