Gulabrao Patil : सर्वाधिक कर्ज बुडवणारी जात पुढाऱ्यांचीच, म्हणून बॅंका..गुलाबरावांनी दाखवला आरसा

Gulabrao Patil Slams Political Leaders Over Loan Defaults : गुलाबराव पाटील म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात को-ऑपरेटिव्ह संस्था काढल्या नाहीत. मी कुठलाही विकास सोसायटीचा संचालक सुद्धा नव्हतो. मात्र, अनिल पाटील आणि संजय पवार यांनी मला जबरदस्तीने फेडरेशनचे संचालक केले.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Gulabrao Patil : अमळनेर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नव्या अत्याधुनिक इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थितांना उद्देशून तुफान फटकेबाजी केली. विशेष यावेळी त्यांनी राजकीय पुढाऱ्यांना बँका कर्ज का देत नाही? याबाबत कारण सांगितलं आहे.

ते म्हणाले, बँका, को-ऑपरेटिव्ह सोसायटी या पुढाऱ्यांना कधीच कर्ज देत नाही. कारण सर्वात जास्त कर्ज बुडवणारी जात ही आपलीच असते, "गुलाबराव पाटील यांनी हे बोलून अप्रत्यक्षपणे राजकीय नेत्यांच्या वर्तनावर टीका केली."

"कर्ज मिळवायचं असल्यास काही ठराविक अटी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. बँकाही कर्ज मंजूर करताना त्याची परतफेड होईल याची काळजीपूर्वक खात्री करतात. कर्जवाटपाच्या प्रक्रियेतील हे बारकावे आणि त्यामागचं राजकारण, यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सविस्तरपणे प्रकाश टाकला."

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अमळनेर येथे अमळनेर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झालं. या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते. ते म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकांप्रमाणेच शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी आता राष्ट्रीयकृत बँका सुद्धा मैदानात उतरल्या आहेत. सुरुवातीला राष्ट्रीयकृत बँका कर्ज देताना गुलाबराव पाटील यांच्या कपड्यांकडे बघून कर्ज देत होत्या. मात्र, आता शेतकरी आणि बचत गटांना सुद्धा या बँका कर्ज द्यायला लागल्या आहेत.

Gulabrao Patil
Eknath Khadse : शरद पवार गेले तर मीही...! खडसे यांनी घातली अजित पवार गटात जाण्यास अट

गुलाबराव पाटील म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात को-ऑपरेटिव्ह संस्था काढल्या नाहीत. मी कुठलाही विकास सोसायटीचा संचालक सुद्धा नव्हतो. मात्र, अनिल पाटील आणि संजय पवार यांनी मला जबरदस्तीने फेडरेशनचे संचालक केले. सहकार विभाग म्हणजे कसे भाजीचे तरंग असते. त्यात इतके कलाकार लोक राहतात, हे दीडशे दोनशे लोकांना येड बनवून निवडून आलेले असतात.

सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणूक सोपी आहे. कारण यांना मर्यादित मतांमध्ये कार्यक्रम करायचा आहे. सोसायटीमध्ये निवडून येणे मोठे अवघड आहे. या ठिकाणी पिढी जात राजकारण सुरु असते. या पद्धतीने मंत्री गुलाबराव पाटील यांनी सहकारातील राजकारणाविषयी भाषणात जोरदार फटकेबाजी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com