Jalgaon Politics: जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यात महायुती सरकारचे तीन मंत्री आहेत. मात्र येथील शेतकऱ्यांना या तिन्ही वजनदार मंत्र्यांचा काहीही लाभ होताना दिसत नाही.
जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षभर अवकाळी पाऊस बेमुसमी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यात केळी सह विविध नगदी पिके घेतली जातात. वर्षभर या पिकांना सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे.
या संदर्भात राज्य शासनाने विविध घोषणा केल्या आहेत. या पिकांचे आणि नुकसानीचे पंचनामे देखील झाले आहेत. राज्य शासनाकडून त्यासाठी आर्थिक मदत मिळेल, या अपेक्षेवर शेतकरी आहेत. मात्र राज्य सरकारने अक्षरशः हात वर केले आहेत.
एप्रिल ते डिसेंबर 2024 या आठ महिन्यात शेतकऱ्यांना मोठा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. १.३२ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यासाठी २०९ कोटींची भरपाई अपेक्षित आहे. मात्र अद्याप राज्य शासनाने केवळ ४८.८८ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या २४० कोटींच्या मागणी पैकी केवळ पन्नास कोटी रुपयांचा निधी अद्याप पर्यंत आलेला आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातील महिलांना मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात आले. त्यामुळे तिजोरीत खडखड्यात आहे. हे कारण सातत्याने प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्याचा परिणाम म्हणजे शेतकरी हवालदिल झाला असून लाडकी बहीण योजनेवर तो संताप व्यक्त करीत आहे.
जळगाव जिल्ह्यात महायुतीला भरघोस जागा मिळाल्या आहेत. भाजपचे संकट मोचक आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि संजय सावकारे मंत्री आहेत. मात्र ते आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान अद्याप देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे शेतकरी मंत्र्यांनाही प्रश्न विचारू लागले आहेत.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.