Malegaon Politics: भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावमध्ये बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप केला होता. याबाबत राज्य शासनाने विशेष तपास पथक नियुक्त केले आहे. त्यांचा तपास सुरू आहे.
पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आतापर्यंत शेकडो नागरिकांना नोटीस बजावल्या आहेत. त्यांच्या जन्म दाखल्यांची तपासणी केली जात आहे. यासाठी शेकडो नागरिक या पथकाकडे संपर्क करीत आहेत. अद्याप एकही बांगलादेशी नागरिक सापडलेला नाही.
या प्रश्नावरून मालेगाव शहरात जोरदार राजकारण आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मायनॉरिटी डिफेन्स ॲक्शन कमिटीचे नेते माजी आमदार असिफ शेख यांनी यासंदर्भात एमआयएम पक्षाचे आमदार मौलाना मुफ्ती यांना जबाबदार धरले आहे. मालेगाव शहरात तीन गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी त्यांनी जोरदार राजकारण तापवले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार आसिफ शेख पराभूत झाले आहेत. या पराभवामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच त्यांनी स्वतःच सत्ताधारी पक्षाशी संधान साधले आहे. त्यातूनच मालेगावच्या जनतेवर हे आपत्ती आली, असा आरोप आमदार मौलाना मुफ्ती यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मालेगाव शहरामुळे या मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्याचा सूड ते मालेगावच्या मतदारांवर उगवत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना आपली हार मान्य नसावी. त्याचा वचपा ते मालेगावच्या नागरिकांना संकटात टाकून काढत आहेत. अशा गंभीर आरोप आमदार मौलाना मुफ्ती यांनी केला.
विशेष तपसपथकाकडून शेकडूनगरिकांना त्यांच्या जन्म दाखल्यांच्या तपासणीसाठी नोटीस देण्यात आली आहे. मूळ कागदपत्रांसह शेकडो नागरिकांनी एसआयटी पथकाशी संपर्क केला आहे. ज्यांना नोटीस बजावली नाही, असे नागरिक देखील या पथकाशी संपर्क करून आपले दाखले खरे असल्याची प्रचिती घेत आहेत.
अद्याप एकही बांगलादेशी नागरिक आढळलेला नाही. आढळणार देखील नाही. कारण मालेगावचा प्रत्येक नागरिक एकमेकांना ओळखतो येथे बांगलादेशी किंवा रोहिंग्या मुस्लिम राहूच शकत नाही, असा दावा आमदार मौलाना यांनी केला आहे
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.