Girish Mahajan & Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा; गिरीश महाजन यांचे कानावर हात!

Girish Mahajan; Girish Mahajan's cautious stand on Manikrao Kokate's resignation-कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामेबाबत महायुतीची सावध भूमिका

Sampat Devgire

Manikrao Kokate News: दहा टक्के कोट्यातील सदनिका प्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यामुळे कृषिमंत्री कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागणार, अशी स्थिती आहे. त्यासाठीचा दबाव वाढत आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात येईल का? या प्रश्नावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सावध भूमिका घेतली आहे. या संदर्भात विविध स्तरावर मागणी केली जात आहे. मात्र त्याबाबत मत व्यक्त करण्यासाठी मी अधिकृत नाही असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

कृषिमंत्री कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र या प्रकरणातील तांत्रिक बाजू देखील समजून घेतल्या पाहिजेत. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. ते याबाबत लवकरच निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले.

कृषिमंत्री कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षाचे शिक्षा ठेवली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार त्यांचे सदस्यत्व धोक्यात आहे. या संदर्भात सोमवारी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. त्यांना तत्पुरता जामीन मंजूर करण्यात आला असून अपील करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी आहे.

या संदर्भात विरोधी पक्षांसह काही सामाजिक संस्था देखील आक्रमक झाले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी देखील शिक्षा झालेल्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सध्या कृषी मंत्री कोकाटे यांचा राजीनामा चर्चेचा विषय ठरला आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे.

जलसंपदा मंत्री महाजन यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी घरकुल वाटप योजनेचा आढावा घेण्यात आला. नाशिक विभाग घरकुल वाटप योजनेमध्ये आघाडीवर आहे. प्रशासनाच्या कार्यकुशलतेमुळे ते शक्य झाल्याचे महाजन म्हणाले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT