Nashik municipal elections Girish Mahajan And Ajit Pawar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics : नाशिकमध्ये भाजपच्या आत्मविश्वासाला राष्ट्रवादी सुरूंग लावणार? 100 प्लसचा नारा देणाऱ्या महाजनांना अजित पवारच तारणार

Ajit Pawar’s NCP Vs BJP Girish Mahajan : भारतीय जनता पक्षाने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत हंड्रेड प्लसचा नारा दिला आहे. त्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन रणनीती आखताना दिसत आहेत.

Sampat Devgire

NCP Ajit Pawar News: भारतीय जनता पक्षाला महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका जिंकणे प्रतिष्ठेचे आहे. स्वबळाची क्षमता नसल्यास विरोधी पक्षांच्या इच्छुकांना पायघड्या अंथरल्या जात आहेत. तर हे सर्व उपाय जिल्हा परिषदेसाठी निरुपयोगी ठरण्याची चिन्हे आहेत. भारतीय जनता पक्षाने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत हंड्रेड प्लसचा नारा दिला आहे. त्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत. अनेक वादग्रस्त नेत्यांना भाजपने प्रवेश दिला.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे हे धोरण शहरात भाजपच्याच अंगलट आल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला. पोलीस आयुक्तांना राजकीय पुणे कारण विरुद्ध कारवाईची मोकळी देण्यात आली आहे. त्याचा परिणाम भाजप सध्या बचावात्मक आहे.

महापालिकेत भाजपला जिंकण्याचा आत्मविश्वास आहे. हाच भाजपचा आत्मविश्वास जिल्हा परिषदेसाठी मात्र हरवला आहे. महायुतीचा घटक पक्ष असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष सत्ताधारी आहे. या पक्षातील कोणीही भाजपमध्ये जाण्याची चिन्हे नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्ह्यात सात आमदार आहेत. आतील छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे हे दोघे मंत्री आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तेचा पुरेपूर लाभ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे.

जिल्ह्यातील सात आमदारांच्या कार्यक्षेत्रात ४२ जिल्हा परिषद गट येतात. या गटांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. उमेदवारीसाठी आमदारांना कौशल्य पणाला लावावे लागेल. भाजपचे डॉ राहुल आहेर (चांदवड) आणि दिलीप मंगळू बोरसे (सटाणा) हे दोघे आमदार आहेत. या दोन्ही आमदारांना स्थानिक पातळीवर प्रबळ राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. जागा वाटपात महायुतीच्या पक्षांना बरोबर घेण्याचे राजकीय बंधन त्यांच्यावर आहे.

नाशिक जिल्हा परिषदेला भाजपला आजवर स्वबळावर मोठा पल्ला गाठता आलेला नाही. आगामी निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचाच दबदबा राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीवर भाजपचा विस्तार अवलंबून असेल. राज्यात मोठा भाऊ असला तरी जिल्ह्यात मात्र भाजपला पडती भूमिका घेणे क्रमप्राप्त आहे.

FAQs :

1. भाजपने नाशिकसाठी कोणता नारा दिला आहे?
भाजपने नाशिक महापालिकेसाठी “हंड्रेड प्लस” म्हणजे 100 पेक्षा अधिक जागांचा लक्ष्य ठेवले आहे.

2. गिरीश महाजन यांची भूमिका काय आहे?
ते या निवडणुकीत भाजपची रणनीती आखत असून कोणत्याही थराला जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

3. नाशिक जिल्हा परिषदेत भाजपची स्थिती कशी आहे?
आजवर भाजपला जिल्हा परिषदेत स्वबळावर मोठे यश मिळालेले नाही.

4. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव अजूनही आहे का?
होय, अजित पवार पक्षाचा नाशिकमध्ये अजूनही मोठा प्रभाव आहे.

5. भाजपचा विस्तार कोणावर अवलंबून आहे?
राजकीय सूत्रांनुसार, भाजपचा विस्तार अजित पवार यांच्या मर्जीवर अवलंबून असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT