Girish Mahajan : डोनाल्ड ट्रम्प अन् दादा भुसेंचे घनिष्ट संबंध, गिरीश महाजनांनी हसत हसत चिमटा काढला
Nashik Guardian Minister : नाशिकचे पालकमंत्रीपद मंत्री गिरीश महाजन यांना जाहीर झाले होते, पण दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसेनेने विरोध केला. त्यामुळे महाजन यांना पालकमंत्रीपद सोडावं लागलं. तेव्हा पासून जे रखडलं ते अद्याप पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही.
त्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदावर महायुतीमधील तिन्ही पक्षांनी दावा केला. राष्ट्रवादीनेही आमचे जिल्ह्यात सर्वांधिक आमदार असल्याचे सांगत पालकमंत्रीपदावर दावा केला. त्यात विशेषत: मंत्री छगन भुजबळ, अॅड. माणिकराव कोकाटे हे इच्छुक होते. त्यानंतर अनेकदा पालकमंत्रीपदाचा प्रश्न उपस्थित होऊनही त्यावर काही तोडगा निघाला नाही. आता तर नाशिकचा कुंभमेळाही अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपला आहे, तरी पालकमंत्र्याचा पत्ता नाही.
मागच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अहिल्यानगरला आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यासोबत त्यांची बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत काही तोडगा निघाला का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिंधींनी मंत्री दादा भुसे यांना विचारला होता.
त्यावर भुसे यांनी अतिशय मिश्किलपणे उत्तर दिलं होतं. भुसे म्हणाले की, 'नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच न्यावा लागेल", भुसेंच्या या वक्तव्याने एकच हशा पिकला होता.
आता त्यानंतर दादा भुसेंनाही त्यांच्याच स्टाईलने अर्थात मिश्किलपणे मंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावला आहे. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे झालेल्या एका कार्यक्रमानंतर महाजन यांनी या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. महाजन म्हणाले, मंत्री भुसे यांच्या म्हणण्यानुसार कदाचित डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे घनिष्ठ संबंध असतील. त्यामुळे ते ट्रम्प यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सोडविण्याची विनंती करतील. किंवा फोन करून सांगतील की काही तरी करा म्हणून.. असा टोला महाजन यांनी लगावला आहे.
माझे तसे कोणासोबतही अमेरिकेत संबंध नाहीत किंवा मी तिकडे गेलोही नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील माझी नाशिकच्या पालकमंत्रीपदाविषयी चर्चा झालेली नाही असं महाजनांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.