Girish Mahajan : नाशिकमध्ये इमारत पाडताना मंदिराचे नुकसान, गिरीश महाजनांनी तिथे जाऊन मागितली माफी

Nashik temple damage Girish Mahajan apology : नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असून गर्दी नियंत्रणासाठी गोदाघाट अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहे.
Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने पंचवटी परिसरात रामकाल पथ तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत गोदाघाट प्रशस्त करण्यासाठी रामकुंडावरील वस्त्रांतरगृह पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने वस्त्रांतरगृह पाडण्याचे काम सुरु असताना जवळील दत्त मंदिराचा काही भाग तुटल्याने पुरोहित संघाने काम बंद पाडले होते.

त्यानंतर शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी घटनास्थळी जात पुरोहितांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर हा वाद अधिकच वाढू नये म्हणून स्वत: कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रामतीर्थावर धाव घेतली. मंत्री महाजन नम्रपणे म्हणाले, वस्त्रांतरगृहाची इमारत पाडताना मंदिराचे नुकसान झाले, त्याबद्दल मी मागतो. हा एक अपघात आहे. यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू अजिबात नाही. पूर्वीपेक्षा अधिक सुंदर मंदिर बांधून दिले जाईल असा शब्द दिल्यानंतर वादावर पडदा पडला.

नेमकं काय झालं?

वस्त्रांतरगृह पाडताना आजूबाजुच्या प्राचिन मंदिरे सुरुक्षित राहावी म्हणून त्यांना वाळूच्या गोण्यांनी झाकण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारात पाडकाम सुरु असताना वस्त्रांतरगृहाचा काही भाग जवळील दत्त मंदिरावर कोसळला. त्यामुळे मंदिराच्या कळसाच्या भागाचे नुकसान झाले. शुक्रवारी सकाळी पुरोहित रामकुंडावर विधी करण्यासाठी आले असता त्यांच्या हे लक्षात आले. त्यांनी तत्काळ पाडकाम बंद करत कारवाईला विरोध केला. यावेळी महापालिके विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली.

Girish Mahajan
Nashik ZP Election : सिन्नरमध्ये काका-पुतणीत रंगणार सामना? भारत कोकाटेंच्या भाजप प्रवेशाने गणितं बदलली

त्यानंतर गिरीश महाजन यांनी स्वत:रामकुंडावर येऊन पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सतीश शुक्ल व इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच, उर्वरित बांधकाम पाडताना काळजी घेतली जाईल. नुकसान झालेले मंदिर लवकरच पुन्हा बांधण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Girish Mahajan
Nashik BJP : भाजपच्या 'त्या' दोन माजी नगरसेवकांची यंदाची दिवाळी 'कोठडीतच', न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

महाजन म्हणाले, यंदाच्या कुंभमेळ्यात २०१५ च्या तुलनेत चारपट गर्दी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर अतिक्रमणमुक्त केले जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांनी रामतीर्थावर सुरु असलेल्या कामांची यावेळी पाहणी केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीसंदर्भात कोणतीही अडचण येणार नाही असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com