Sanjay Raut & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना अधिकार असताना पालकमंत्री ठरवायला अमित शाह, मोदींकडे का जायचं? राऊतांचा सवाल; म्हणाले, ‘शेवटी मांडवली झाली’

Sanjay Raut On Girish Mahajan : संजय राऊत यांनी नाशिकला काढलेल्या मोर्चाच्या मुहूर्तावरच गिरीश महाजन यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्याने राऊतांनी संताप व्यक्त केला. त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली.

Ganesh Sonawane

Sanjay Raut On Nashik Guardian Minister : गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य सरकारकडून नाशिक आणि रायगड दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे तर रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

दरम्यान कुंभमेळा मंत्री असलेल्या मंत्री महाजन यांचीच नाशिकच्या पालकमंत्रीपदावर नियुक्त झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भाजपकडून आज जल्लोष साजरा केला जाणार आहे. त्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत यांनी पालकमंत्रिपदाच्या निर्णयावरूनही सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, पालकमंत्री कोणाला करायचे, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असे म्हणतात. मग दोन जिल्ह्यांचा पालकमंत्रिपदाचा वाद अमित शाह यांच्याकडे का न्यायचा आणि पंतप्रधानांकडे का जायचे? शेवटी तडजोड झाली, मुंबईच्या भाषेत सांगायचं तर ‘मांडवली’ झाली.

महाजन कुंभमेळा मंत्री आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याच्या कामांबाबत आणि रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जनतेने त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. महाजनांनी त्यावर उत्तर दिलं पाहीजे. पालकमंत्री या नात्याने खड्ड्यांमुळे मृत झालेल्या कुटुंबियांसाठी 1 कोटी प्रत्येकी मुख्यमंत्री यांच्याकडून मंजूर करून आणा. पैसे खा, सरकारचे जावई पैसे खात आहे. जो पैसे खाऊन काम करत नाही त्याला भ्रष्टाचार म्हणतात. भ्रष्टाचाराला राजमान्यता मिळाली आहे, अशी टीका त्यांनी केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा विषय साधा नाही. नाशिकला भुसे, भुजबळ आणि झिरवळ यांनाही पालकमंत्री व्हायचे होते. असही राऊत म्हणाले.

राऊत नाशिकमध्ये असतानाच घोषणा

दरम्यान नाशिकमधील रस्त्यांची दुरावस्था व खड्ड्यांच्या विरोधात संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीकास्र सोडलं. अपघातात खड्ड्यांमुळे जे दहा लोक मरण पावले आहेत. हे मृत्यू नसून प्रशासनाने केलेले 10 खून आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना राऊत यांनी 'चंपतराय' आणि 'कुंभकर्ण मंत्री' अशी उपमा दिली. कुंभमेळ्याच्या नावाखाली महाजन भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न राबवत असल्याचा आरोप राऊतांनी केला.

मात्र, याच दरम्यान सरकारकडून मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदावर घोषणा झाल्याने संजय राऊतांचा संताप झाल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच महाजनांची पालकमंत्री म्हणून घोषणा झाली. त्यावर निर्लज्ज लोक आहेत. पहिल्यांदाच पालकमंत्रीपद मिळालं का? असं काही आहे का? यांच्याकडे अकलेचा दुष्काळ आहे. गिरीश महाजन यांच्याशी माझे व्यक्तिगत भांडण नाही. मात्र, आमच्या मोर्चाच्या मुहूर्तावरच त्यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती झाली. असा संताप राऊतांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT