Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्रिपदी निवड होताच गिरीश महाजन म्हणाले : ‘मला आज पांडुरंग पावला...’

Nashik Guardian Minister Issue : महायुती सरकारमधील नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला. नाशिकची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली असून, महाजन यांनी आनंद व्यक्त केला.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 17 August : महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाला होता. सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली तरी या दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा प्रश्न मिटत नव्हता. मात्र, आता हा तिढा सोडविण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांना यश आले आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा हाती येताच मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला आज पांडुरंग पावल्याची भावना बोलून दाखवली आहे.

विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी आज मी माझ्या मतदार संघातील 15 हजार लोकांसोबत पंढरपूरला आलो आहे. दर्शन घेतल्यानंतर मी नाशिकचा पालकमंत्री झाल्याची बातमी प्रथम माझा पत्नीने मला दिली. आज खरोखर मला आणि माझा कुटुंबाला पांडुरंग पावला, अशी भावनिक प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे नवे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात बोलताना दिली.

गिरीश महाजन म्हणाले, ऐतिहासिक कुंभमेळ्याच्या कामाला गती मिळेल. यापूर्वी कुंभमेळा मंत्री म्हणून माझावर जबाबदारी होती. आता पालकमंत्री या नात्याने आणखी वाढली आहे. पालकमंत्री म्हणून मी नाशिक आणि कुंभमेळ्याला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे.

Girish Mahajan
BJP MLA Threat Case : भाजप आमदाराला गोळ्या घालण्याची सुपारी देणारा आरोप म्हणतोय, ‘मी सहज बोललो...’

नाशिक शहरातील 80 टक्के खड्डे बुजवले आहेत. उर्वरित खड्डे बुजवण्याचा काम सुरू आहे. कायमस्वरुपी नाशिकला खड्डे मुक्त करायचे आहे, त्यासाठी शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक हजार कोटी रूपये मंजूर केले आहेत. नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरात साडेचार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, असे गिरीश महाजन यांनी नमूद केले.

Girish Mahajan
Manohar Bhosale : मनोहर भोसलेच्या पैशाची विल्हेवाट लावणे भोवले; भाजप नेत्याच्या पत्नीला अटक, भावाचीही चौकशी

पालकमंत्रिपदासाठी मी कधीही आग्रह केला नाही‌, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे. येणरा कुंभमेळा ऐतिहासिक होणार आहे. या निमित्ताने नाशिकचे रूप बदलायचे आहे, त्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com