Girish Mahajan & Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar: 'गिरीश महाजनांच्या मतदार संघात रोहित पवारांनी मतदारांना जिंकले'

Allegations of vote buying against Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजन जामनेरच्या मतदारांना पैसे वाटून विकत घेऊ पाहत आहेत?

Sampat Devgire

Jalgoan Election: भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात आमदार रोहित पवार यांची सभा झाली. या सभेला मिळालेला प्रतिसाद आणि उपस्थित आणि आमदार पवार यांच्यातील संवाद चर्चेचा विषय आहे. या सभेत मंत्री महाजन यांच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी आमदार पवार म्हणाले, जामनेरच्या मतदारांनी गिरीश महाजन यांना आमदार केले. ते मंत्री झाले. पण या मंत्रिपदाचा उपयोग त्यांनी कशासाठी केला? मतदारसंघासाठी काय केले? याचे उत्तर त्यांच्याकडे आहे का?.

मंत्री महाजन हे स्वतःला 'संकट मोचक' म्हणून घेतात. हे संकट मोचक पिस्तूल घेऊन मतदार संघात फिरतात. मतदारांना घाबरवण्यासाठी पिस्तूल घेऊन फिरतात का? असे मतदार विचारतात. मंत्री महाजन कोणाचे संकट दूर करतात?. फडणवीस यांचे संकट दूर करतात. भाजपचे संकट दूर करतात.

आज जामनेरचे नागरिक संकटात आहेत. मतदारसंघातील नागरिक संकटात असताना त्यांचे संकट महाजन यांनी दूर केले का?. येथील कापूस उत्पादक शेतकरी रडतो आहे. कापसाला भाव नाही. त्यासाठी या संकट मोचकाने काय केले?.

बेरोजगार युवक नोकरी मागतात. त्यांना नोकरी दिली का?. शेतमालाला भाव नाही. या संकटावर महाजन यांनी काही केले का? मंत्री गिरीश महाजन मतदारसंघातील नागरिकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीही केले नाही, असा दावा आमदार पवार यांनी केला.

महाजन हे मंत्री झाले. या मंत्रिपदाचा उपयोग त्यांनी मतदार संघासाठी काय केला, असा गंभीर प्रश्न आहे. या मतदारसंघाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. महाजन एखाद्या गावात जाऊ शकत नाहीत. अशी दयनीय अवस्था येथील रस्त्यांचे आहे.

मंत्री महाजन स्वतःला आरोग्य सेवक म्हणवतात. मग येथील नागरिकांना उपचारासाठी लांबच्या शहरात का जावे लागते. त्यांनी या मतदारसंघात एखादा दवाखाना उभा केला का?. ते असा दवाखाना का उभा करू शकले नाही, असा प्रश्न आमदार पवार यांनी केला.

या मतदारसंघात दहशत आहे. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला जात आहे. प्रचंड प्रमाणात पैसे वाटप होण्याची शक्यता आहे. पैसे वाटप करून जमणार जामनेरच्या मतदारांना मंत्री महाजन विकत घेऊ इच्छितात.

मात्र मतदार आपला स्वाभिमान कधीही पैसे घेऊन विकणार नाहीत. आता येथील मतदार आणि त्यांचा स्वाभिमान दोन्हीही जागे झाले आहेत. त्यामुळे महाजन यांना नेहमीचे फंडे करता येणार नाहीत. कारण ही निवडणूक आता जनतेने आपल्या हाती घेतली आहे, असे आमदार पवार म्हणाले.

भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सरकारला महाराष्ट्रात गुजरातशाही आणायची आहे. आपल्या राज्यातील उद्योग आणि बरेच काही गुजरातला जात आहे. मात्र मराठी माणूस कधीही गुजरात किंवा दिल्ली पुढे झुकणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला आहे. हा स्वाभिमान येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मतदानातून दाखवायचा आहे. धन दांडग्यांच्या विरोधात एका सामान्य कार्यकर्त्याला आमदार करायचे आहे. असे सांगत तुम्ही खोडपे यांना आमदार करणार ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित त्यांना केला. त्यावर उपस्थित त्यांनी प्रचंड गर्जना करीत त्याला होकार दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT