Nirmala Gavit Politics: काँग्रेसच ठरलं; इगतपुरीतून माजी आमदार निर्मला गावित उमेदवार!

Igatpuri constituency : इगतपुरी मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेच्या उपनेत्या निर्मला गावित यांना उमेदवारी दिली जाणार आहे.
Nirmala Gavit & Balasaheb Thorat
Nirmala Gavit & Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Igatpuri News: काँग्रेस पक्षाचा इगतपुरी मतदारसंघात उमेदवार कोण? हा गंभीर प्रश्न होता. त्याचे उत्तर शोधण्यात स्थानिक पदाधिकारी यशस्वी झाले आहेत. लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

क्रॉस वोटिंग केल्यामुळे आमदार हिरामण खोसकर यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून गंभीर कारवाई करण्यात येणार होती. हाय कमांडने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आमदार खोसकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला होता.

त्यामुळे इगतपुरी विधानसभा मतदारसंघात उमेदवार कोण हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडे जवळपास 18 इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली होती. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पक्षापुढे निवड करण्याची मोठी समस्या होती.

या संदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मतदारसंघाची जबाबदारी विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली होती. याबाबत माजी आमदार निर्मला गावित या शिवसेनेच्या उपनेते आहेत. मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे असल्याने शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नव्हती.

Nirmala Gavit & Balasaheb Thorat
Jayant Patil Politics: जयंत पाटलांच्या भेटीसाठी माजी मंत्री बबन घोलप यांची चार तास प्रतीक्षा!

या संदर्भात माजी आमदार गावित यांनी शिवसेना नेत्यांची संपर्क केला होता. अखेर जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने शिवसेनेने माघार घेतली होती. वरिष्ठ नेत्यांच्या संमतीनेच माजी आमदार गावित यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती.

त्याबाबत विधिमंडळ नेते थोरात यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांची संपर्क करून आणि बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याची सूचना दिली होती. काल दुपारी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर काँग्रेस तालुका कार्यकारिणीची बैठक झाली. त्याला विविध पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावले.

प्राप्त परिस्थितीत माजी आमदार गावित याच प्रबळ उमेदवार ठरू शकतात असे ठरले. या बैठकीनंतर रात्री काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांची इगतपुरी येथे भेट घेण्यात आली. सर्व कार्यकर्त्यांच्या सूचना विचारात घेऊन श्री थोरात यांनी माजी आमदार गावित या उमेदवारी करण्यास तयार आहात का? याची विचारणा केली.

Nirmala Gavit & Balasaheb Thorat
Ajit Pawar politics: अजित पवार यांनी दाखवली भीती, विरोधक योजना बंद करतील!

यासंदर्भात आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही कळविण्यात आले आहे. त्यामुळे माजी आमदार गावित यांना इगतपुरी मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. आगामी निवडणुकीत आता आमदार हिरामण खोसकर हे महायुतीचे उमेदवार असतील.

आमदार खोसकर यांच्या विरोधात काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीच्या माजी आमदार गावित उमेदवारी करणार आहेत. इगतपुरी मतदारसंघात गेले तीन टर्न काँग्रेसच्या उमेदवाराला विजय मिळवता आला. यंदा चौथ्यांदा काय होते, याची सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

काँग्रेस पक्षाचे काही नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यामुळे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना मैदानात उतरून काम करावे लागेल. या मतदारसंघात प्रामुख्याने काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे. यामध्ये कसा समन्वय प्रस्थापित केला जातो, यावर निवडणुकीचे आडाखे अवलंबून असतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com