Rahul Dhikle | Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : गिरीश महाजन ॲक्टिव्ह; आमदार राहुल ढिकले यांच्या प्रचाराला येणार गती!

Nashik East Assembly Constituency: भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शहरातील भाजप नेत्यांची नाराजी दूर.

Sampat Devgire

Maharashtra Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सुसूत्रता निर्माण करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला. यासंदर्भात त्यांनी नाशिक शहरातील नाराज भाजपच्या पदाधिकारी व नेत्यांची चर्चा केली. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होण्याच्या सूचना या नेत्यांना देण्यात आल्या.

भारतीय जनता पक्षाच्या शहरातील त्यांनी विद्यमान आमदारांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारांचा प्रचार देखील सुरू झाला आहे. मात्र काही पदाधिकाऱ्यांच्या नाराजी मुळे त्यात अडथळे येत होते.

या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन कालपासून दोन दिवस ही नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करीत होते. याबाबत नाशिक पूर्व मतदार संघातील विविध पदाधिकाऱ्यांची त्यांनी काल रात्री व्यक्तीशः चर्चा केली होती. या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी आणि अडचण समजून घेण्यात आल्या.

त्यानंतर आज कॉलेज रोड येथील एका कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी आमदार राहुल ढिकले यांसह मंत्री महाजन यांची बैठक झाली. यावेळी आमदार ढिकले आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक व चर्चा होऊन प्रचारात सुसूत्रता आणण्यासाठी काय उपाययोजना करण्याचा निर्णय झाला.

शहरातील जेलरोड नासिक रोड आणि नांदूर या भागातील काही पदाधिकारी त्यांच्या व्यक्तिगत तक्रारी आणि अन्य काही कारणांनी नाराज होते. यातील काही नेते उमेदवारीसाठी इच्छूक होते. या पदाधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत अडचण सोडविण्याच्या सूचना मंत्री महाजन यांनी या बैठकीत दिल्या.

या बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर झाल्याने नाशिक पूर्व मतदारसंघातील प्रचाराचा तिढा आता सुटला आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात आमदार राहुल ढिकले यांच्यासाठी अतिशय प्रभावी प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी सर्वांनी त्यात सहभागी व्हावे, असे यावेळी मंत्री महाजन यांनी संबंधितांना सांगितले.

नाशिक मध्य आणि पश्चिम मतदार संघातही विविध पदाधिकारी आणि चूक उमेदवार नाराज होते. या नाराज पदाधिकाऱ्यांची महाजन यांनी व्यक्तिशः चर्चा केली.. यामध्ये विविध माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवारांचाही समावेश होता.

या इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची नाशिक पश्चिम आणि मध्य मतदारसंघातील आमदारांविषयी तक्रारी होत्या. या आमदारांचा पदाधिकाऱ्यांची संपर्क आणि समन्वय नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. त्यावर मंत्री महाजन यांनी संबंधित आमदारांना त्याबाबत कामकाजात दुरुस्ती करण्याच्या सूचनाही केल्याचे कळते.

शहरातील नाराज पदाधिकाऱ्यांची चर्चा करून हा विषय आता संपविण्यात आला आहे. त्यानंतर मंत्री महाजन जळगावकडे रवाना झाले. मंत्री गिरीश महाजन आज आणि उद्या जळगाव जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील पक्षाचे व महायुतीचे नाराज पदाधिकारी आणि बंडखोर उमेदवारांची चर्चा करणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील या बंडखोरांनी निवडणुकीतून माघार घ्यावे असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. त्यात मंत्री महाजन यांना किती यश मिळते याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT