Narendra Modi: पंतप्रधान मोदी यांच्या सभांचा धडाका नाशिक पासून होणार सुरवात....

PM Modi Nashik Campaign Launch: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 8 नोव्हेंबरला नाशिकला विधानसभा निवडणुकीची प्रचार सभा
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ८ नोव्हेंबरला धुळे आणि नाशिक येथे प्रचार सभा घेणार आहेत. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या या सभा यशस्वी करण्यासाठी सक्रिय झाली आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीची महायुतीच्या प्रचाराची सुरुवात यंदा नाशिक येथून होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आठ नोव्हेंबरला नाशिक आणि धुळे येथे जाहीर सभा घेणार आहेत. या सभा यशस्वी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी आज पदाधिकाऱ्यांची चर्चा केली.

पंतप्रधान मोदी यांच्या सभांचे राज्यभरातील नियोजन पक्षाने केले आहे. त्या दृष्टीने प्रचाराच्यादेश कार्यकारिणीतील काही पदाधिकारी या सभांचे नियोजन आणि व्यवस्था यात सक्रिय आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नाशिक जिल्ह्यात पाच मतदारसंघात उमेदवार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघात मोठी बंडखोरी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाची यंत्रणा सक्रिय करण्याचे मोठे आव्हान आहे. शहरात पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे.

Narendra Modi
Ramdas Athawale : आठवले समर्थक संतापले, प्रचारासाठी महायुतीशी असहकार!

शहरातील तिन्ही मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. यंदा या तिन्ही उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यातील नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या दिनकर पाटील यांनी पक्षाचा राजीनामा देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी केली आहे.

माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान मोदी यांची प्रचार सभा होणार असल्याने वातावरण निर्मिती आणि या उमेदवारांना निवडणूक सोपी व्हावी म्हणून पदाधिकारी सक्रिय झाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या सभेने या उमेदवारांना शंभर टक्के यश मिळेल, असा दावा मंत्री गिरीष महाजन यांनी केला आहे. या संदर्भात पक्षाच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठकही झाली आहे. पंतप्रधान मोदी यांची सभा असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Narendra Modi
Girish Mahajan : गिरीश महाजन यांची पदाधिकाऱ्यांची मध्यरात्रीपर्यंत पंचतारांकित मनधरणी!

या सभेला किती गर्दी होईल याचा अंदाज आणि व्यवस्था दोन्हींसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांची यापूर्वी लोकसभा निवडणुकीत पिंपळगाव बसवंत येथे सभा झाली होती. या सभेला मोठी गर्दी झाली होती.

या सभेनंतर देखील दिंडोरी मतदारसंघातील उमेदवाराचा पराभव झाला होता. हा अनुभव लक्षात घेता पक्षाच्या नेत्यांना नाशिकचे सभेबाबत जास्तीचे प्रयत्न आणि काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी चार दिवस आधीच या सभेच्या तयारीसाठी पक्षाचे प्रदेश पदाधिकारी नाशिक मध्ये दाखल होणार असल्याचे बोलले जाते.

उत्तर महाराष्ट्रात ३५ मतदार संघ आहेत. राज्यातील निवडणुकीत सर्वाधिक आमदार या भागातून निवडून येणार आहेत. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने अतिशय नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी परिश्रम घेत असल्याने उत्तर महाराष्ट्र यंदा भाजपला सर्वाधिक जागा मिळवून देईल असा दावा मंत्री महाजन यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com