Girish Mahajan & Uddhav Thackrey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: गिरीश महाजन संतप्त, म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांनी स्वतःची पात्रता ओळखावी'

Girish Mahajan says Uddhav Thackeray Allegations Have no Value: मंत्री गिरीश महाजन यांचा दावा, उत्तर महाराष्ट्रात भाजपला विधानसभेच्या सर्वाधिक जागा मिळतील.

Sampat Devgire

Thackrey Vs Mahajan: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नाशिक येथे भाजपची आढावा बैठक झाली. या बैठकीमुळे पदाधिकाऱ्यांत नवा उत्साह आला आहे. ही बैठक पक्षाला सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी उपयुक्त ठरेल असा पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे.

उत्तर महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील भारतीय जनता पक्षाचे सर्व मंत्री आणि आमदार यांचा पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.

श्री. शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली होती. श्री. शहा यांचे दौरे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने फलदायी होतील का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

यावर मंत्री महाजन यांनी ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांची पात्रता श्री शाह यांच्यावर टीका करण्याएवढी नाही. ठाकरे यांना भाजप नेते शहा यांच्यावर टीका करण्याचा कुठलाच अधिकार उरलेला नाही. त्यांनी स्वतःची पात्रता तपासली तर बरे होईल, असा टोमणा यावेळी मंत्री महाजन यांनी मारला.

उत्तर महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा देणारा विभाग ठरेल, असा दावा त्यांनी केला. नाशिकच्या बैठकीत श्री. शाह यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आहे. त्या दृष्टीने ही बैठक आगामी विधानसभा निवडणुकीत काय करायचे आणि भूत स्तरावर कोणते, नियोजन असावे याचा स्पष्ट संदेश देण्यात यशस्वी ठरली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत महाजन यांनी विरोधकांवर टीका केली. मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. त्यांना पहिल्यांदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आरक्षण दिले होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासनाने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे विरोधकांनी याबाबत कितीही रान पेटवले तरी उपयोग होण्याची शक्यता नाही, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी महायुतीने यापूर्वीच सुरू केली आहे. आमचे सर्व पदाधिकारी अतिशय एक दिलाने काम करीत आहे. कोणालाही मुख्यमंत्री कोण याची चिंता नाही. महाविकास आघाडीमध्ये मात्र निवडणुकीआधीच मुख्यमंत्री कोण यावरून भांडण सुरू आहे.

या भांडणातच महाविकास आघाडीच्या नेत्यांचा वेळ जात आहे. त्यामुळे आम्हाला त्यांची काहीही चिंता किंवा आव्हान वाटत नाही, असे महाजन यावेळी म्हणाले

एकंदरच केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सक्रिय करण्यात नेते यशस्वी झाले आहेत. नेत्यांना मिळालेला हा संदेश विधानसभा मतदारसंघात गेल्यावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT