Jayant Patil Politics: देवळालीचे नऊ इच्छुक एकत्र, जयंत पाटलांना म्हणाले "तो" उमेदवार नको!

Jayant Patil Candidate Selection for Devlali Assembly Elections: देवळालीतील राष्ट्रवादीचे नऊ इच्छुक शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने एकत्र आलेले दिसले.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Devlali Constituency: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा बुधवारी देवळाली मतदार संघात होती. यावेळी सर्व नऊ इच्छुक उमेदवार एकत्र आल्याचे दिसले. ही एकी उमेदवार जाहीर झाल्यावर टिकणार का? याची आता उत्सुकता आहे.

शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अपेक्षित असलेल्या मतदार संघात कार्यक्रम होत आहेत. यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सर्व इच्छुकांना एकत्र रहा, पक्ष उमेदवार देईल त्या उमेदवाराचा प्रचार करा, आगामी निवडणुक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची आहे. असे आवाहन करीत आहेत.

ही यात्रा दोन दिवस नाशिक जिल्ह्यात होती. समारोपाच्या दिवशी ती देवळालीत आली होती. यावेळी प्रदेशाध्यक्षांचा संदेश लक्षात घेऊन नऊ इच्छुक उमेदवारांनी एकत्र येत त्यांनी या यात्रेचे स्वागत केले. या उमेदवारांचे एकत्रीत फोटो असलेले फ्लेक्स लावण्यात आले होते.

त्यातून आम्ही सगळे एक आहोत हा संदेश देण्याचा या इच्छुकांचा प्रयत्न होता. तो काही प्रमाणात यशस्वी झाला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी यांना उमेदवारांना बंद दारावर एकत्र घेऊन संवाद साधला.

Jayant Patil
Bhanudas Murkute on Vikhe : 'विखेंना निवडणुकीत पराभव दिसू लागला त्यामुळे त्यांनी..' ; मुरकुटेंचा हल्लाबोल!

यावेळी या सर्व उमेदवारांनी सध्या भारतीय जनता पक्षात असलेल्या मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार लॉबिंग करणाऱ्या राजश्री अहिरराव यांना उमेदवारी देऊ नये, अशी एक सुरात मागणी केली. श्रीमती अहिरराव यांनी निवडणुकीसाठी तहसीलदार पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

श्रीमती अहिरराव यांच्यावर विविध आरोप त्यांचे राजकीय विरोधक करीत असतात. मूळ धुळे येथील अहिरराव देवळाली मतदारसंघातून उमेदवारीसाठी पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे देवळालीच्या सर्व स्थानिक इच्छुकांना भारतीय जनता पक्षातून आलेल्या अहिरराव यांना उमेदवारी मिळते की काय याची भीती वाटत असावी.

गत निवडणुकीत लक्ष्मण मंडाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे दोन वर्ष मतदारसंघात जाऊन प्रचार केला होता. पक्षानेच त्यांना निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मात्र ऐनवेळी स्थानिक नेत्यांच्या डावपेचांमुळे भाजप मध्ये असलेल्या सरोज अहिरे यांना उमेदवारी देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे या व्यथा मांडण्यासाठी स्पर्धाच लागली होती.

Jayant Patil
Chandrashekhar Bavankule: अमित शहा महाराष्ट्रात आल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची घाबरगुंडी उडाली

आमदार अहिरे गेल्या निवडणुकीत विजयी झाल्या. मात्र त्यांनी बंडखोरी करून उपमुख्यमंत्री अजित पवार गटाशी सख्य केले आहे. त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार आहे. अशा स्थितीत गेले काही दिवस मतदार संघात फिरून काम करणाऱ्या श्री मंडाले यांसह अन्य उमेदवारांना आपली उमेदवारी निश्चित व्हावी, यासाठी परिश्रम करावे लागत आहेत

प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याशी इच्छुक लक्ष्मण मंडले यांनी देवळाली मतदारसंघाबाबत विविध राजकीय माहिती दिली. त्यानंतर विहितगाव येथे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या नऊ उमेदवारांशी बंद दाराआड चर्चा केली. यावेळी श्री. मंडाले, दीपक वाघ, संतोष साळवे, डी. वाय. पगारे, जयंत आहेर, सुवर्णा दोंदे, सुनील कोथमीरे, संजय कुऱ्हाडे, विलास निकम यांचा समावेश होता.

यातील चार ते पाच उमेदवार अन्य पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. यातील देवळालीच्या आणि नुकत्याच पक्षात आलेल्या एका उमेदवाराने जोरदार भाषण करीत बाहेरचा उमेदवार नको, असा दावा केला. बाहेरचा उमेदवार नको हे देखील बाहेरच्या उमेदवारानेच सांगावे हा यावेळी चर्चेचा विषय ठरला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com