Girish Mahajan News: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना मधाचे बोट लावले आहे. गेल्या आठवड्यात दोन माजी महापौरांसह सात नगरसेवकांनी भाजप प्रवेश केला. आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय जनता पक्षात होणारे प्रवेश हे विकासासाठी होत असल्याचा दावा केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांचे नाव न घेता ते म्हणाले, सकाळी नऊच्या भोंग्याला सगळेच कंटाळले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षात राहण्यास कोणीही तयार नाही.
महापालिका निवडणुकीची तयारी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार सुरू आहे. पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील आणखी काही नेत्यांचे भाजप पक्षात प्रवेश होतील. निवडणुकीआधी एक ते दोन मोठे सोहळे होतील असा दावाही मंत्री गिरीश महाजन यांनी केला.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बडतर्फ उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक नेत्यांचा विरोध होता. हा विरोध अद्यापही मावळलेला नाही. पक्षातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक बडगुजर यांच्या प्रवेशाने नाराज आहेत. सध्या तर या विषयावरून पक्षात दोन गट निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी ही नाराजी लवकरच दूर होईल असा दावा केला. यापूर्वीही अनेक माजी मंत्री आणि नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी त्याआधी भाजपच्याच नेते व कार्यकर्त्यांविरुद्ध निवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे स्थानिक पातळीवर वाद होणे स्वाभाविक आहे.
प्रत्यक्ष निवडणुका सुरू होतील तेव्हा हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपच्या विजयासाठी एक दिलाने काम करतील. त्यावेळी सर्व आपसातील वाद बाजूला ठेवण्यात येतील. हे वाद संपविण्यासाठी वरिष्ठ नेते प्रयत्नशील असून त्यात यश येईल असा दावा महाजन यांनी केला.
गेले काही दिवस भाजप महापालिका निवडणुकीत १०० प्लस असा दावा करीत होते. त्याबाबत विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता होती. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी आता यु टर्न घेतला आहे. भाजप नवे तर महायुतीचे शंभर प्लस असे टार्गेट असल्याचा खुल्याचा त्यांनी केला.
विरोधी पक्षातील काही माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी भाजपच्या संपर्कात आहे. विशेषता नाशिक पूर्व मतदार संघात भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात उमेदवारी केलेल्या गणेश गीते यांना पक्षात घेण्यास पदाधिकाऱ्यांचा मोठा विरोध आहे. याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेश होतील त्याबरोबरच पक्षांतर्गत असंतोषही वाढणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.