Nashik Loan Harassment: नाशिकमध्ये भाजपच्या नेत्यांकडून सावकारी, दुपटीने वसुलीसाठी कर्जदारांचा होतोय छळ!

BJP Leaders in Nashik Accused of Loan Harassment and Illegal Recoveries: सावकारी प्रकरणात भाजपचा दुसरा नेता जाळ्यात, राजकीय सावकारांचे पोलिसांपुढे आव्हान.
BJP leader in Illegal Money laundering
BJP leader in Illegal Money launderingSarkarnama
Published on
Updated on

Nashik BJP Leader Fraud: नाशिक शहर आणि जिल्ह्यात सहकार विभागाने अवैध सावकारीविरोधात मोहीम उघडली होती. त्यात राजकीय नेत्यांची संबंधित अनेक सावकार आढळले. नाशिक शहरात गुरुवारी असाच एक सत्ताधारी पक्षाचा राजकीय नेता पोलिसांच्या रडारवर आला आहे.

नाशिक शहरात राजकीय पक्षांचे नेत्यांची असलेली संबंध आणि पदाधिकारी याच्याकडून चक्क सावकारी सुरू आहे. यात भारतीय जनता पक्षाचा दुसरा नेता पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गरजूंना कर्ज दिल्यावर दुपटीपेक्षा अधिक वसूल करण्याची या सावकारांची पद्धत गरजूंचा छळ करणारी आढळल्याचा पोलिसांचा दावा आहे.

अवैध सावकारीच्या प्रकरणात काल एक धक्कादायक खुलासा झाला. भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असलेल्या सागर भूषण वैष्णव याने कर्ज दिलेल्या व्यक्तीचा छळ करीत पैसे दिल्यानंतरही वसुलीसाठी धमकी दिली. संबंधित व्यक्तीने पोलिसांची संपर्क केल्यावर सागर वैष्णव याच्याविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BJP leader in Illegal Money laundering
Narhari Zirwal Politics: दिंडोरीत राष्ट्रवादीत कोणती? मंत्री झिरवाळांची की श्रीराम शेटेंची? नेत्यांचा दोन्ही गटात वावर, मतदारांचा संभ्रम!

सत्ताधारी भाजपचा नेता असल्याने वैष्णव याच्याविरोधात आतापर्यंत तक्रार करण्याचे धाडस कोणीही केले नव्हते. त्याचाच गैरफायदा घेऊन आणि भाजपच्या पदाचा धमकीसाठी वापर करीत वैष्णव याच्याकडून कर्जदारांकडून बेकायदा वसुली सुरू होती. एक लाख रुपये कर्ज दिल्यानंतर व्याजासह कर्जदाराने पैसे अदा केले होते. मात्र वैष्णव याने दुपटीने पैसे परत देण्याचे धमकावल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.

पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर सहकार विभाग देखील सक्रिय झाला. सहकार विभागाने सागर वैष्णव यांच्या घरी छापा टाकून झडती घेतली. या झडतीत वैष्णव याच्या घरातून कोरे धनादेश, स्टॅम्प पेपर, वसुलीसाठी वापरण्यात येणारे वाहन आणि विविध संशयास्पद गोष्टी आढळल्या.

शहरातील श्रमिक नगर परिसरात राहणारा सागर वैष्णव हा भाजप नेता असून त्याचे स्वतंत्र जनसंपर्क कार्यालय आहे. पक्षाच्या विविध नेत्यांसमवेत असलेले फोटो त्यांनी या कार्यालयात लावले आहेत.

सत्ताधारी पक्षाचा नेते असल्याचा दाग दाखवत तो गरजूंना दहा ते वीस टक्के दरमहा दराने व्याजाने पैसे देत होता. त्याच्या जाळ्यात अडकलेल्या वसंत घायाळ याने पोलिसांची संपर्क केल्यावर हे कारणामे उघड झाले.

अवैध सावकारी केल्याची पोलिसांत तक्रार दाखल झालेला भाजपचा शहरातील हा दुसरा नेता आहे. दोन महिन्यांपूर्वी भाजपचा नेता व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जवळीक असल्याचा दावा करणारा रोहित कुंडलवाल याने एका कापड व्यापाराच्या छळ केला होता.

५० लाखाच्या वसुलीसाठी त्याने व्यापाऱ्याच्या मुलीचे अपहरण देखील केले होते. त्याच्या घरात घुसून संबंधितांना बंदुकीचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार संबंधीत कापड व्यापाऱ्याने केली होती. याबाबत कुंडलवान यासह त्याचे वडील व अन्य सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com