Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan Politics: गिरीश महाजन संतापले, "ज्यांना पदे, प्रतिष्ठा दिली तेच सोडून जातात"

Girish Mahajan;The rebels will not be allowed back into the Bharatiya Janata Party-विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरांच्या दबावाला दाद देऊ नये, असे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

Sampat Devgire

Girish Mahajan News: विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर आले आहे. उद्या सायंकाळी प्रचार बंद होईल. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी हितगुज केले. जळगाव जिल्ह्यातील निवडणुकांचा कल जाणून घेतला.

यावेळी मंत्री गिरीष महाजन म्हणाले, ज्यांना पक्षाने मोठे केले. राजकारणात स्थिरस्थावर केले. अनेक पदे दिली. अशा लोकांचे समाधान होत नाही. त्यांच्या अपेक्षा वाढतच असतात. त्या लोकांनी भाजपशी निष्ठा ठेवली नाही. अशा बंडखोरी केलेल्या लोकांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.

जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. जळगाव मध्ये भाजपचे उमेदवार लाखाच्या मताधिक्क्याने विजयी होत असतात. ही परंपरा यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहील. विरोधकांच्या प्रचाराचा कोणताही परिणाम भाजपच्या उमेदवारांवर होणार नाही.

भाजप हा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर मोठा झालेला पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निष्ठेने आपली भूमिका या निवडणुकीत बजवावी. पक्षाने बूथ स्तरावर आपली यंत्रणा भक्कम केली आहे. प्रत्येक गावात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा प्रभाव आहे. जिल्ह्यातील बहुतांशी संस्थांवर पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या सगळ्यांचा एकत्रित परिणाम दिसून येईल.

भाजपला मोठे यश मिळेल असा दावा त्यांनी केला. जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील काही मतदारसंघांमध्ये भाजपच्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांना बंडखोरांची संघर्ष करावा लागत आहेत. या बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र त्यात यश आले नाही.

आता पक्षाने कठोर निर्णय घेण्याचे ठरविले आहे. बंडखोरांना पक्षाचे दरवाजे कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. या बंडखोरांना कोणत्याही परिस्थितीत भविष्यात भाजप प्रवेश देणार नाही, असा दावा त्यांनी केला. बंडखोरांकडून कितीही दबाव आला तरी, निर्धास्त होऊन काम करावे. दबावाला बळी पडू नये. प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क करावा. भाजपच्या विरोधकांना चोख उत्तर देण्याची क्षमता पक्षाकडे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बंडखोर आणि विरोधकांच्या दबावाला आणि अपप्रचाराला अजिबात भीक घालू नये, असेही मंत्री महाजन म्हणाले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT