Nashik MLC Eelction : नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडे स्पष्ट बहुमत होतं. एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, तरीही महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा तब्बल १०९ मतांच्या फरकाने अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी पराभव करत विजय मिळवल्याने ही निवडणूक ऐतिहासिक ठरली.
ज्या दिवशी गोकुळ गीते निवडून आले त्याच दिवशी पुढच्या काही तासांत त्यांनी मुंबईत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करत असल्याची घोषणा केली. आता आमदार गोकुळ गीते यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना एक खळबळजनक दावा केला आहे. नाशिकच्या विधान परिषद निकालाची एकनाथ शिंदे यांना चार दिवस आधीच कल्पना होती असा दावा गिते यांनी केला आहे.
नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते यांनी यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, सोमवारी निकाल लागल्यानंतर तातडीने एकनाथ शिंदे साहेबांच्या भेटीसाठी मला मुंबईला जावे लागले. त्याच दिवशी रात्री मी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. मंत्री गिरीश महाजन हेच मला वर्षा बंगल्यावर घेऊन गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विधिमंडळात आमदार म्हणून शपथविधी देखील झाला.
गिते म्हणाले, मतदानाच्या दिवशीच एकनाथ शिंदे साहेबांना निवडणूक आणि मतदारांचा कौल लक्षात आला होता. मधल्या चार दिवसांच्या काळात त्यांना नाशिकमधून अनेक लोकांचे फोन गेले होते. शिंदे साहेब आपली जागा निवडून येत नाही असं लोकांनी त्यांना कळवलं होतं. समोरचा उमेदवार निवडून येत आहे असं लोकांनी सांगितलं. शिंदे साहेबांसारखा मोठ्या मनाचा माणूस मी पाहिला नाही. त्यांनी मोठ्या मनाने माझे स्वागत केले. पाठीवर शाब्बासकीची थाप दिली.
मतदान झाल्यानंतरच मी दुसऱ्या दिवशी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची गुप्त भेट घेतली होती. या भेटीत मी त्यांना विश्वास दिला होता की, मी 100 पेक्षा जास्त मतांनी जिंकून येईल.100 पेक्षा कमी मतांनी जिंकून आलो तर मी 6 वर्ष अपक्ष म्हणून काम करेल. पण, 100 पेक्षा जास्त मतांनी निवडून आलो तर तुम्ही मला नक्की स्वीकाराल, अशी विनंती त्यांना केली होती असा गौप्यस्फोट गितेंनी केला. सुप्रिया ताई सुळे यांच्या मुलीच्या लग्नात आमची भेट झाली होती असं गोकुळ गितेंनी सांगितलं.
त्यानंतर श्रीकांत शिंदे साहेबांनी निकालाच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांना सांगितले होते की, 100 पेक्षा जास्त मतांनी निवडून येईल असा शब्द मला गोकुळ देऊन गेला आहे. त्यामुळे साहेबांना या गोष्टीचा आनंद झाला की, हा पठ्ठ्या सांगून गेला होता आणि खरंच हा जिंकून आल्याचं गोकुळ गिते म्हणाले.
महायुतीच्या जागावाटपाच्या वेळी ही जागा शिवसेनेला सुटेल असे निदर्शनास आल्यानंतर आम्ही तेव्हाच एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली होती. शिवसेनेचा एबी फॉर्म द्या, आम्ही तुम्हाला ही जागा प्राप्त करुन देऊ असे सांगत आम्ही उमेदवारी मागितली होती. मात्र, शिंदे साहेबांनी दराडेंना शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी दराडेंना उमेदवारी दिली.
नाशिकची जागा निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी खूप प्रयत्न केला होता. मात्र, दराडे यांच्या पराभवामुळे ती जागा शिवसेनेकडून गेली. महायुतीमध्ये मिठाचा खडा नको म्हणून मी शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. तर, आगामी काळात शिंदे साहेब सांगतील तेव्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.