

Nashik MLC Election : बहुचर्चित नाशिक विधानपरिषद निवडणुकीचा निकाल महायुतीसाठी धक्कादायक ठरला. अपक्ष गोकुळ गिते यांनी महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दारुण पराभव केला. एकनाथ शिंदेसाठी हा निकाल धक्कादायक ठरल्याचं बोललं जात असतानाच आता या निवडणुकीत मोठा ट्विस्ट समोर आला आहे.
अपक्ष निवडून आलेल्या गोकुळ गीते यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत आजच पक्षप्रवेश होणार असल्याची दाट शक्यता आहे. आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटाच्या ६ बंडखोर खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर बहुतेक गोकुळ गिते देखील आजच शिवसेनेत प्रवेश करु शकतात.
स्वत: शिवसेनेचे मंत्री व संपर्क नेते उदय सामंत हे गोकुळ गिते यांना घ्यायला नाशिकमध्ये आले. एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या विशेष विमानाने उदय सामंत हे गोकुळ गिते यांना घेऊन मुंबईला गेले आहेत. त्यामुळे मुंबईत गोकुळ गिते यांचाही शिवसेनेत प्रवेश आजच होतो का हे पाहावे लागेल.
निवडणूक निकाल लागल्यानंतर उदय सामंत यांनी गोकुळ गिते यांचे जवळचे सहकारी नाना गामणे यांना फोन करुन एकनाथ शिंदे यांचा मुंबईला येण्याचा निरोप पोहचवला. त्यानंतर चक्र फिरली. गोकुळ गितेंनी मुंबईकडे जाण्याची तयारी केली. तेवढ्यात मंत्री उदय सामंतही नाशिकमध्ये पोहचले. माध्यमांशी बोलताना गिते यांना मुंबईत बोलावल्याची बातमी खरी नसून अफवा आहे असं म्हणणारे उदय सामंत स्वत: आपल्यासोबत गितेंना मुंबईला विमानाने घेऊन गेले आहेत.
गोकुळ गिते यांच्या विजयानंतर त्यांचे बंधू गणेश गिते यांनाही त्यांच्या शिवसेना प्रवेशावर विचारले असता, मी स्वत:त्याला शिंदेसेनेत प्रवेश कर असाच सल्ला देईल असं सूचक विधान गणेश गिते यांनी केलं. मी माझ्या घरी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील सांगितले होते की, यापुढे गोकुळ त्याचा कुठलाही निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकतो. मी त्याला ती मुभा दिलेली आहे. त्यामुळे आता कुठे जायचे आणि कुठे थांबायचे हा निर्णय तो घेईल असे गणेश गिते यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.