Gokul Gite : नाशिकचे नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते शिवसेनेच्या ताफ्यात : एकनाथ शिंदे अन् उदय सामंत यांनी अवघ्या 12 तासांत फिरवली सूत्र

Gokul Gite : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष विजयी झालेले गोकुळ गीते यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. त्यांच्या निर्णयामुळे नाशिकच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Gokul Gite, Uday Samant
Gokul Gite, Uday SamantSarkarnama
Published on: 
Updated on: 

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या अपक्ष गोकुळ गीते यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर त्यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारत असल्याची घोषणा केली आहे. मुंबईमध्ये गोकुळ गीते आणि एकनाथ शिंदे यांची प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर गीते यांनी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर केली.

पुढील राजकीय प्रवासाबाबत बोलताना गोकुळ गीते म्हणाले, "आज सकाळी खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, उन्मेष पाटील आणि आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. विधानपरिषदेत मला शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याची इच्छा मी त्यांच्याकडे बोलून दाखवली.

या प्रस्तावानंतर गीते यांना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या 'नंदनवन' बंगल्यावर बोलावण्यात आले. तिथे एकनाथ शिंदे आणि गोकुळ गीते यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. यानंतर शिंदे यांनी गीते यांना शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्यास अधिकृत परवानगी दिली. "भविष्यात पक्षाने जी काही संघटनात्मक जबाबदारी दिली, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल," असेही गीते यांनी यावेळी स्पष्ट केले.

Gokul Gite, Uday Samant
Gokul Gite : अपक्ष जिंकलेले गोकुळ गीते आता एकनाथ शिंदेंचेच 'खास'; सहयोगी झालेच पण लवकरच शिवसेनेत प्रवेश!

आपल्या राजकीय इतिहासावर बोलताना गिते यांनी भाजपसोबतचे संबंध स्पष्ट केले. ते म्हणाले, "मी भाजपचा सक्रिय सदस्य नाही. सुरुवातीला भाजपच्या वतीने माझे भाऊ गणेश गीते यांना या उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर मी गणेश गीतेंची भेट घेऊन या जागेची मागणी केली होती. मात्र, एकनाथ शिंदेंनी आधीच नरेंद्र दराडे यांना शब्द दिला असल्याने महायुतीचा धर्म पाळत गणेश गीतेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला."

"माझ्या मित्रांनी आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक पुढे नेली होती. भाजप नेते गिरीश महाजन यांनी मला विनंती केल्यानंतर मी माझा अधिकृत प्रचार थांबवला होता आणि घरात बसलो होतो. मात्र, नरेंद्र दराडे यांनी आमच्या एका नगरसेवकाशी बोलताना 'तो काय, त्याचा बाप पण माघार घेईल' असे अहंकारातून केलेल्या वक्तव्याने कार्यकर्त्यांचे मन दुखावले होते. याच विधानामुळे माझे कार्यकर्ते आणि मतदार दुखावले गेले आणि त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करून मला विजयी केले, असेही गीते म्हणाले.

Gokul Gite, Uday Samant
MLC Election : मराठवाड्यात केलेले धाडस आघाडीच्या अंगलट : महायुतीचा बोलबाला; चारही जागा जिंकल्या

उदय सामंत न्यायला स्वतः आले होते :

सकाळी गोकुळ गीते यांचा विजय झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने सूत्र फिरवून गीते यांच्या शिवसेना प्रवेशासाठी प्रयत्न केले. स्वत: उदय सामंत हे गोकुळ गिते यांना नाशिकमध्ये घ्यायला आले. एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या विशेष विमानाने सामंत हे गोकुळ गिते यांना घेऊन मुंबईला गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Eknath Shinde | Uday Samant
Uday Samant
Kisan Chougule
Gokul Election
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com