Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal; शेतकऱ्यांना कसली जात विचारता, शेतकरी हीच त्यांची जात!

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) कांद्याच्या घसरलेल्या भावाच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या प्रश्नावर चांगलीच टोलेबाजी केली. भाजपचे (BJP) सरकार भाव वाढल्यावर निर्यात बंद का करते. तुम्ही शेतकऱ्यांच्या (Farmers) गाड्यांना जॅमर लावता, त्यांना जात विचारता अहो शेतकरी ही त्यांची जात आहे, असा टोला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला लगावला आहे. (Chhagan Bhujbal target Goverment on Farmers issue)

कांदा प्रश्नावर श्री. भुसे यांनी कांदा उत्पादकांना कमी भाव मिळत असल्याची वस्तुस्थिती असल्याचे सांगत ‘नाफेड’च्या माध्यमातून सव्वालाख टन खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी श्री. भुजबळ यांनी ‘नाफेड’तर्फे लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी केली.

या पार्श्वभूमीवर श्री. भुजबळ यांनी कांद्याला अनुदान द्या, असे सांगत २००२ मध्ये आम्ही ३०० कोटी रुपये खर्चून कांदा विकत घेतला होता, याची आठवण करून दिली आहे.

ते म्हणाले, सध्या भाजपचं सरकार आहे, कांद्याला भाव वाढतात त्या वेळी हे सरकार निर्यात का बंद करते?. मोदींनी २०१४ मध्ये नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असे सांगितलं होतं. दुप्पट तर जाऊ द्या, खर्चही निघेना.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर टोलवाटोलवी करू नका, त्यांना क्विंटलला एक हजार रुपये अनुदान द्या अशी मागणी भुजबळ यांनी केली. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसेल, तर ताबडतोब अनुदान दिले पाहिजे. किसान सन्मान योजनेत चुकीच्या शेतकऱ्यांना पैसे गेले म्हणून ते परत घ्यायला जिल्हाधिकाऱ्यांनी ‘टार्गेट’ दिले, हे खरे आहे काय असा प्रश्न भुजबळ यांनी केला.

राज्य सरकार म्हणते बारा हजार रुपये देणार. १२ हजार वर्षाला म्हणजे महिन्याला एक हजार मिळणार, म्हणजे ही शेतकऱ्यांची थट्टाच आहे. पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कसे सावरणार ते सांगांवे. कांदा उत्पादकांना क्विंटलमागे दीड हजार रुपये मिळतील यासाठी काय करावं, हे तुम्ही सांगा आम्ही ते करू. शेतकऱ्यांचे समाधान झाले तर मग आम्ही आंदोलन करणार नाही.

तुमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या गाड्यांना जॅमर लावले, म्हणजे हे किती कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणावेत?. अहो तुम्ही तुम्हाला गुन्हेगारांना जॅमर लावता येत नाही. तुम्ही शेतकऱ्यांना जात विचारता. त्यांना कसली जात विचारता, शेतकरी हीच त्यांची जात आहे. मात्र राज्याचे कृषिमंत्री फार बिझी असतात, त्यांना खूप कामे असतात. त्यांच्याबद्दल जास्त न बोललेल बरं, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT