Nashik News; पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकातील जवानाचा मृतदेह वीस तासांनी सापडला

संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल पालकमंत्री दादा भुसेंना घेराव घातला.
SPG Commando Ganesh Gite
SPG Commando Ganesh GiteSarkarnama
Published on
Updated on

सिन्नर : (Nashik) सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विशेष सुरक्षा पथकातील चालक गणेश सुखदेव गिते (वय ३६) (Sukhdev Gite) या जवानाचा गोदावरी कालव्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह अथक शोध मोहिमेनंतर शुक्रवारी तब्बल वीस तासांनी मिळून आला. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी आलेल्या पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत घेराव घातला. (SPG commando Sukhdev Gite died ins Godavari canal)

SPG Commando Ganesh Gite
Satyajeet Tambe News: खर्चाचा बाऊ न करता जुनी पेन्शन लागू करा!

जवान गणेश गिते गुरुवारी सायंकाळी कालव्याच्या प्रवाहात बुडाले. बारा तासांनंतरदेखील त्याचा ठावठिकाणा न लागल्याने जिल्हास्तरीय यंत्रणा खडबडून जागी झाली. पालकमंत्री दादा भुसे यांनी धाव घेत शोधमोहिमेला गती दिली.

पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासोबत शिर्डी येथे साईदर्शन करून घराकडे परतणाऱ्या गणेश यांची दुचाकी ब्राह्मणवाडे-मेंढी रस्त्यावरील पुलावरून कालव्यात कोसळली होती. पाण्यात बुडालेल्या या चौघांना वाचवण्यासाठी स्थानिकांनी कालव्यात उड्या मारल्या. गणेश यांची पत्नी रूपाली (३०), मुलगी कस्तुरी (७) व मुलगा अभिराज (दीड वर्ष) यांना वाचविण्यात यश आले.

SPG Commando Ganesh Gite
Nashik News; पाकिस्तानमधील परिस्थितीमुळे कांदा दर कोसळले?

या तिघांना बुडण्यापासून वाचवण्यासाठी दीडशे फुटापर्यंत प्रयत्न करणारा गणेश मात्र पाण्यात बुडून बेपत्ता झाले. रहिवाशांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. गोदावरी कालव्याला नुकतेच आवर्तन सुटल्याने पाण्याचा वेग अधिक होता.

आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी व जलसंपदा विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी व जलसंपदा अधिकाऱ्यांची मनधरणी करून गोदावरी कालव्याचे नांदूरमध्यमेश्वर धरणातून सोडलेले आवर्तन तातडीने बंद करण्याची विनंती करण्यात येत होती. मात्र, त्याकडे उभय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

SPG Commando Ganesh Gite
Sharad Pawar News; नागालँडमध्ये भाजपला पाठींबा दिलेला नाही!

शुक्रवारी सकाळी यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी दौरा रद्द करून अपघातस्थळी धाव घेतली. यावेळी प्रशासनाच्या गलथानपणामुळे घटनेचे गांभिर्य वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही सकारात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे जवानाचा मृतदेह सापडला नाही असा आरोप करीत ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत घेराव घातला.

संतप्त जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत पालकमंत्री भुसे यांनी जोपर्यंत गणेश यांचा मृतदेह सापडत नाही, तोपर्यंत मी इथून जाणार नाही, असे सांगितले. भुसे यांनी शोध पथकांना नियोजनबद्ध तपास करण्याच्या सूचना दिल्या व ते स्वतः घटनास्थळीच थांबून राहिले. मृतदेह सापडल्यानंतर पुढाकार घेत त्यांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. त्यानंतर मृत जवान गणेश यांच्या घरी जात त्यांच्या वडिलांचे व भावाचे सांत्वन केले.

SPG Commando Ganesh Gite
Dada Bhuse News; दादा भुसे यांनी संजय राऊत यांची उडवली खिल्ली!

तत्पूर्वी सकाळी आवर्तन बंद करण्यात आले. चांदोरी व दिंडोरी येथील ‘एनडीआरएफ’ची बचाव पथके प्रत्यक्ष शोधकार्यासाठी दाखल झाली होती. पाण्याला वेग व खोली अधिक असल्याने मदतीत अडथळे येत होते. चांदोरी व दिंडोरी येथील पथकांच्या मदतीला नाशिक व मालेगाव येथून ‘एनडीआरएफ’च्या बचाव पथकांना पाचारण केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com