उत्तर महाराष्ट्र

Gram panchayat election News : निवडणुका झाल्या तरी गावपातळीवर जिरवा-जिरवीचे राजकारण !

Nagar Election Fever : निवडणुका झाल्या तरी गावपातळीवर जिरवा-जिरवीचे राजकारण पाहायला मिळत आहे.

Pradeep Pendhare

Nagar News : ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. दिवाळी फराळाचा दरवळ सुरू आहे. विजयी झालेल्या उमेदवारांची डबल दिवाळी आहे. 'होऊ दे खर्च', अशी विजयी उमेदवारांची दिवाळी दिसते आहे. निवडणुकीत पराभव झालेले काही सावरलेत, तर काही अजून सावरायला तयार नाहीत. जे सावरायला तयार नाहीत, ते कागदोपत्री लढाईच्या तयारी आहेत. तक्रारी करण्याच्या तयारी आहे. म्हणजेच, पुढील काळात गावपातळीवर काही ठिकाणी जिरवा-जिरवीचा संघर्ष पहायला मिळणार आहे.

नगर जिल्ह्यात 194 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यात काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतीत सर्व पक्षाच्या गटाने आम्ही एक नंबर असल्याचा दावा केला. निवडणुकीनंतर सर्व काही शांत होईल, असे वाटत असताना आता वेगळीच चर्चा काही ठिकाणांहून समोर येवू लागली आहे. काहींना निवडणुकीतील पराभव पचनी पडायला तयार नाही. यासाठी प्रशासकीय पातळीवर आपल्या विरोधकाविरोधात लढाईची तयारी सुरू केली आहे. यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जाणार आहे.

या प्रामुख्याने विरोधकाच्या अतिक्रमणाचा मुद्दा शोधला जात आहे. अतिक्रमण सिद्ध झाल्यास सदस्यत्व रद्द होते. काही विरोधकांनी समोरच्या विजयी उमेदवाराचे अतिक्रमण आहे का, याचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. यासाठी कागदोपत्राची जुळवाजुळव सुरू केली आहे. यात बांधकामाचा उतारा शोधण्यापासूनची तयारी केली आहे. विजयी उमेदवार देखील गाफिल नाही. सत्तेत असल्याने पराभूत उमेदवाराची ग्रामपंचायतीमधून इतिहासाची कुंडली काढून घेत आहेत.

याशिवाय अपत्याचा मुद्दा देखील आहे. दोन पेक्षा जास्त मुले असल्यावर सदस्यत्व रद्द होते. याचाही काही विरोधकांकडून हा मुद्दा देखील तपासला जात आहे. विजयी उमेदवारांच्या कुटुंबाची माहिती घेतली जात आहे. अर्ज भरताना अपत्याविषयी दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात असलेल्या अपत्य, यांचा ताळमेळ विरोधकांकडून तपासला जात आहे. जन्म दाखल्यांबरोबर अपत्यांविषयी वेगवेगळ्या नोंदी शोधल्या जात आहे. यात काहींना वेगवेगळी माहिती हाती लागली आहे. यातून गावात चर्चा होत आहे. वाद होत आहे.

दिवाळी सणामुळे हे वाद उफाळले नसले, तरी भविष्यात मात्र यातून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विरोधकांची ही 'फिल्डिंग' विजयी उमेदवारांच्या नजरेतून सुटलेले नाही. विजयी उमेदवार देखील सावध भूमिकेत आहे. वादाचे प्रसंग टाळत आहे. परंतु विरोधक जास्तच आक्रमक होताना दिसल्यास विजयी उमेदवारांनी देखील समोरच्याची जिरवण्याची तयारीत आहे. यातून पुढील काळात गावपातळीवर जिरवा-जिरवीचे राजकारण रंगणार, असे दिसते आहे.

तक्रारदाराविरोधात अशी लागतेय 'फिल्डिंग'!

गावपातळीवर या निवडणुकीत पॅनलप्रमुखांनी आजी-माजी आमदार, खासदार गटाचे, असे गट पडले आहेत. पराभूत उमेदवारांचे उपद्रव मूल्य रोखण्यासाठी विजयी उमेदवारांनी नेत्यांकडे पॅनलप्रमुखांद्वारे फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. यासाठी दिवाळी सणाच्या शुभेच्छाचे निमित्त करून गाठीभेटी घेत आहे. आजी-माजी आमदार, खासदार, पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांच्या कानावर माहिती टाकत आहेत. हे नेते देखील या तक्रारी एेकून घेत असून, पुढे पाहू, असे म्हणत आहे.

SCROLL FOR NEXT