Marathwada Water Issue: न्यायालयाच्या निकालापर्यंत नाशिकहून पाणी न सोडण्याचा निर्धार!

Marathawada water issue, Irrigation department shall no order for Power cut-नाशिकची तहान टँकरच्या पाण्यावर, शेतीचा प्रश्न गंभीर अशा स्थितीत मराठवाड्याच्या शेतीला पाणी कसे देता?
Jaikwadi Project & Amruta Pawar
Jaikwadi Project & Amruta PawarSarkarnama
Published on
Updated on

Marathawada Water issue : नाशिकच्या पाटबंधारे प्रकल्पांतून जायकवा़डी धरणांसाठी पाणी सोडण्याची तयारी नाशिकच्या जलसंपदा विभागाने सुरू केली होती. त्यासाठी कालव्याच्या काठावरील गावांतील वीज खंडीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्याला विरोध झाला आहे. (Irrigation Depaertment shall wait on Marathawada water up to Supreme court decision)

नाशिकच्या (Nashik) भाजप (BJP) नेत्या अमृता पवार यांनी मराठवाड्याच्या जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी(Water) सोडण्यास विरोध केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात तसेच मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे.

Jaikwadi Project & Amruta Pawar
Manoj Jarange Patil News : शेणीत येथे १०१ एकरवर रेकॉर्डब्रेक सभेचा निर्धार!

यासंदर्भात नाशिकच्या विविध लोकप्रतिनिधींनी नाशिक, नगरच्या प्रकल्पांतून ८.६ टीएमसी पाणी जायकवाडी प्रकल्पासाठी सोडण्याच्या औरंगाबाद गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. याबाबत पाण्याच्या वितरणासंदर्भात झालेल्या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे विविध लोकप्रतिनिधींनी देखील विरोध दर्शविला होता. त्यावर पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील प्रशासनाने न्यायालयात दाखल याचिकांबाबत काय निर्देश येतो, याची प्रतिक्षा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

जलसंपदा प्रकल्पांतून पाणी सोडण्याच्या चार ते पाच दिवस आधी एक्सप्रेस कालव्या लगतच्या गावांचा वीजपुरवठा खंडीत केला जातो. यासंदर्भात गेल्या आठवड्यात ती प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र त्याला विरोध झाल्यावर न्यायप्रविष्ठ बाब असल्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणीनंतरच पाण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर येथे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या (ता.१६) कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. त्यात समन्यायी पाणी वाटप कायद्याला विरोध करून जायकवाडीसाठी पाणी न सोडण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार आशुतोष काळे यांसह विविध नेत्यांनी घेतली आहे. या प्रश्नावर नगरचे विविध नेते आग्रही आहेत. पालकमंत्री विखे पाटील यांनी देखील त्याबाबत सर्व माहिती संकलीत केली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याची नाशिक व मराठवाड्याच्या नेत्यांना उत्सुकता आहे.

Jaikwadi Project & Amruta Pawar
Manoj Jarange Patil News : अबब! जरांगेंच्या स्वागतासाठी तब्बल 150 जेसीबी; 5 टन फुलांची उधळण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com