Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gram Panchayat Election Results : शिंदेंची बुलंद तोफ! गुलाबराव पाटलांनी जळगाव ग्रामीणवरील वर्चस्व केले सिद्ध

कैलास शिंदे

Gulabrao Patil and Jalgaon Rural News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटाचे नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुक्यात मतदारसंघात आपले वर्चस्व कायम राखले असून, ३२ पैकी २७ ग्रामपंचायतींवर घवघवीत यश मिळविले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जळगाव व धरणगाव तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींसाठीची निवडणूक पार पडली. ३२ पैकी ५ ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्यामुळे रविवारी २७ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जळगाव तालुक्यातील १७ व धरणगाव तालुक्यातील १५ अशा ३२ पैकी २७ ग्रामपंचायतींमधे शिवसेनेच्या शिंदे गटाचा विजय झाला आहे.

शिवसेना फुटीनंतर गुलाबराव पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, त्यांना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही मिळाले. यानंतर त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात त्यांच्या फुटीवर जोरदार वादळ उठले होते. त्यांना जनतेचा पाठिंबा नसल्याचे सांगितले जात होते, परंतु या विजयाने त्यांनी पुन्हा एकदा आपलेच या मतदारसंघावर वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे.

जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुक्यात ३२ पैकी तब्बल २७ ग्रामपंचायतींवर शिवसेना शिंदे गटाने यश मिळविले आहे. विजयी सरपंचपदाचे उमेदवार असे - जामोद - सतीलाल मधुकर पाटील बिनविरोध , पळसोद -राधाबाई पंकज पाटील , खेडी खु. - तेजस कैलास चौधरी, लोणवाडी खु. - अनिता बळीराम धाडी , निमगाव - अक्षय युवराज पाटील, सुभाषवाडी - जयश्री राजाराम राठोड, पाथरी - वैजयंताबाई मगन शिरसाठ , डोमगाव - विनिता अशोक मंडपे, बेळी - तुषार दिगंबर चौधरी, बिलवाडी - विनोद श्रावण पाटील, धामणगाव - निशिगंधा अनिल सपकाळे , आमोदे बु. भूषण दीपक सूर्यवंशी , विटनेर - नेहा ललित साठे, यांच्यासह १५ पैकी १३ ग्रामपंचायतींवर गुलाबराव पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे.

याशिवाय धरणगाव तालुक्यातील चांदसर - बेबाबाई विश्वास सोनवणे, बिनविरोध , तरडे खु. - कलाबाई पांडुरंग भिल, बिनविरोध , वराड खु. - कलाबाई अशोक भिल, बिनविरोध , भोद खु. - विजय पंडित पाटील बिनविरोध, निमखेडा - सयाबाई ईश्वर पाटील, झुरखेडा - सुरेश गोरख पाटील, बाभूळगाव - पवन गजाजन पाटील, पाळधी बु. - विजय रूपसिंग पाटील, वाकटूकी - सुरेश पोपट पाटील, टहाकळी खु. - सविता सुरेश कोळी , खामखेडा - धिरज गणेश पाटील, फुलपाट - मंगलाबाई दत्तू पाटील, भोद बु. - चंद्रकांत महारु बागुल, तर डॉ. हेडगेवार नगर - सविता धनराज सोनवणे, बोरखेडा - विजय माणिक पाटील, अंजनविहीरे - गणेशकांत गुलाबराव चव्हाण, येथे भाजपने बाजी मारली तर सतखेडा - दीपाली किरण पाटील (अपक्ष)तर कल्याणहोळ येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या कमलाबाई भीमसिंग पाटील यांनी विजय मिळविला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT