Loksabha Election 2024 : भाजपची कोंडी, जळगाव मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा!

Raver & Jalgaon Constituency : भाजप पंचेचाळीस जागांचे नियोजन करीत असताना, अजित पवार गटाने जळगावच्या दोन्ही मतदारसंघांवर दावा सांगितला.
Girish Mahajan & Ajit Pawar
Girish Mahajan & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP Latest News : भारतीय जनता पक्ष लोकसभा मतदारसंघासाठी पंचेचाळीस प्लसचा टार्गेट ठेऊन एक, एक जागेचे नियोजन करीत आहे. मात्र, सरकारमधील सहकारी पक्षांनी त्यांची डोकेदुखी वाढविण्याचा चंगच बांधलेला दिसतो, असे चित्र आहे. (NCP Ajit Pawar Group deemands for both constituencies of Jalgaon)

भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात लोकसभा मतदारसंघासाठी खडाखडी सुरू आहे. त्यातच आता अजित पवार (Ajit Pawar) गटाने त्यात उडी घेतली आहे.

Girish Mahajan & Ajit Pawar
Congress News : काँग्रेसच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक समन्वयकपदी नाशिकचे छाजेड

जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव या दोन्ही मतदारसंघांत भाजपचे विद्यमान खासदार आहेत. पक्षाने यापूर्वीच लोकसभा निवडणुकीचे नियोजन सुरू केले आहे. त्यादृष्टीने सध्या भाजपने या मतदारसंघांवर अन्य कोणाचाही क्लेम नाही, असे गृहीत धरले आहे.

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. मात्र, त्यात राज्य सरकारमधील सहकारी पक्षांकडून खोडा घालण्याचे कामदेखील सुरू झाले आहे. कधीकाळी जळगाव लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघांवर दावेदारी सांगितली आहे. रावेर आणि जळगाव या दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आपल्याला मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सक्रिय झालेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सद्यःस्थितीत जळगाव मतदारसंघात पूर्वी राष्ट्रवादीचे प्राबल्य होते. सद्यःस्थितीत आमदारांचे संख्याबळ विचारात घेता शिंदे गटाचे या मतदारसंघात वर्चस्व दिसते. पाचोरा, एरंडोल-पारोळा आणि जळगाव ग्रामीण येथे शिंदे गटाचे आमदार आहेत. विद्यमान खासदार जरी भाजपचे असले तरीदेखील भाजपची स्थिती नाजूकच आहे. अशा स्थितीत त्यांना मित्र पक्षांची गरज आहे. मात्र, मित्र पक्षांकडून मदतीचा हात देण्याऐवजी थेट मतदारसंघांवरच दावा करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार गटातील इच्छुकांना खासदार झाल्याची स्वप्ने पडू लागली आहेत.

Girish Mahajan & Ajit Pawar
Maratha Reservation News : आमदार कोकाटेंच्या बालेकिल्ल्यात पसरले गावबंदीचे लोण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com