Gram Panchayat Election Results Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gram Panchyat Election Results : जामखेडच्या जवळा, मतेवाडीत स्थानिक आघाड्यांची बाजी ; तर मुंजेवाडीत भाजप

Jamkhed Taluka Gram Panchayat Election : जवळा व मतेवाडीत विजयी झालेल्या पॅनलने आपली राजकीय भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar Politics : जामखेड तालुक्यातील जवळा ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा प्रशांत शिंदे यांनी आपला झेंडा फडकावला आहे. जवळ्यातील जनतेने प्रशांत शिंदे यांच्या हाती ग्रामपंचायतची सत्ता सोपवली आहे. सरपंचपदी सुशील सुभाष आव्हाड हे 650 मतांनी विजयी झाले. तर प्रशांत शिंदे यांच्या पत्नी शीतल शिंदे या सदस्यपदासाठी सर्वाधिक 315 मतांनी विजयी झाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत प्रशांत शिंदे यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले होते. मात्र सर्वपक्षीय नेत्यांना जनतेने साफ नाकारले. प्रशांत शिंदे यांच्यासाठी जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि जवळा ग्रामविकास पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. या पॅनलने सरपंच पदाच्या उमेदवारासह सदस्यपदाच्या दहा जागा जिंकल्या. तर विरोधी शेतकरी ग्रामविकास आघाडीला अवघ्या पाच जागांवर समाधान मानावे लागले.

जामखेड तालुक्यात जवळा, मतेवाडी व मुंजेवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या निकालात, भाजपाने मुंजेवाडी ग्रामपंचायतीत एक हाती वर्चस्व मिळवले. जवळा व मतेवाडी या दोन ग्रामपंचायतीत स्थानिक आघाड्यांनी विजय मिळवला. जवळा व मतेवाडीत विजयी झालेल्या पॅनलने आपली राजकीय भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

''जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विजय झाला. जनतेने जवळा ग्रामविकास पॅनलच्या हाती ग्रामपंचायतची सत्ता सोपवली. आजच्या विजयात कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही.'', अशी पहिली प्रतिक्रिया जवळा ग्रामविकास पॅनलचे प्रमुख प्रशांत शिंदे यांनी विजयानंतर दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT