NCP Pratap Dhakne  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pratap Dhakne News: राष्ट्रवादीच्या प्रताप ढाकणेंना 2024 साठी मोठी गळ; ढाकणेंच्या निर्णयाकडे लक्ष !

NCP : राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांना मोठा सल्ला

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : केवळ पाथर्डीच नव्हे तर जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात नाव कमावलेला ढाकणे परिवार अनेक वर्षांपासून या ना त्या कारणाने काहीसा सत्तेच्या राजकारणापासून दूर आहे. मात्र, आता राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांना ज्येष्ठ समाजवादी नेत्या प्रा.सुशीला मोराळे यांनी मोठा सल्ला देत थेट आष्टी पाटोदा (बीड जिल्हा) मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी गळ घातली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.शिवाजी बडे यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी प्रा.सुशीला मोराळे म्हणाल्या, "पाथर्डी तालुक्याला ढाकणे कुटुंबाच्या योगदानाची जाणीव राहिली की नाही? ज्यांच्या नावावर तुम्ही इकडे डोळे झाकून मते देता (पंकजा मुंडे) त्यांच्यावर त्यांच्याच पक्षात वाईट वेळ आलीय. आज तर त्यांच्यामागे एक तरी आमदार समर्थनासाठी पुढे आला नाही.

तुम्हाला तुमच्या चुका सुधारता येत नसतील तर आता तुम्हाला कुणी वाचवू शकत नाही. प्रताप, तुझ्या तालुक्याला तुझी किंमत कळणार नसेल तर चल, तयारी कर.., आष्टी पाटोदा (बीड जिल्हा) मतदारसंघातून तुला आमदार करून दाखवते", अशा शब्दात प्रा.सुशीला मोराळे यांनी भाष्य करत राजकीय तोफ डागली.

गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांचाही प्रभाव त्यांच्यावर राहिला. पण तरीही ॲड. प्रताप ढाकणे यांना पराभव पत्करावा लागला. ज्यांच्यामुळे पराभव झाला त्यांची राजकीय परिस्थिती पाहता पुढचे राजकीय चिन्ह कसे राहील, याचा विचार करण्याचे यावेळी प्रा.सुशीला मोराळे यांनी त्यांना सुचवले. तसेच झालेल्या चुका सुधारण्याचे आवाहन करत दुसऱ्या बाजूने मुंडे घराण्याचा राजकीय प्रभाव कमी झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

1989 साली बबनराव ढाकणे यांनी बीड जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढवत स्व.केशरकाकू क्षीरसागर यांचा पराभव केला होता. त्यांना आष्टी-पाटोदा विधानसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाले होते. हाच धागा प्रा.मोराळे यांनी पकड ॲड. प्रताप ढाकणे यांना हा सल्ला दिला आहे. पण असं असलं तरी प्रताप ढाकणे हे काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

2009 पूर्वी पाथर्डी आणि शेवगाव हे स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ होते. 2009 पासून मतदारसंघ पुनर्रचनेत या दोन्ही मतदारसंघाचा शेवगाव-पाथर्डी मतदारसंघ करण्यात आला. अनेक वर्षे भाजपात असताना प्रताप ढाकणे यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र, 2014 पूर्वी त्यांनी भाजपसोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पण त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळता चंद्रशेखर घुले यांना मिळाली. तर काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करत स्व.राजीव राजळे यांच्या पत्नी मोनिका राजळे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर 2014 आणि 2019 ला मोनिका राजळे या भाजपकडून आमदार झाल्या.

पाथर्डी-शेवगाव मतदारसंघामध्ये प्रताप ढाकणे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या सभा मेळाव्यांना मोठी गर्दी असते. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून साखर कारखानदारीत त्यांचं पाथर्डी-शेवगाव तालुक्यात जाळं आहे.

एक धडाडीचा नेता आणि परखरड वक्तृत्व व मैत्री जपणारी व्यक्ती अशी ओळख प्रताप ढाकणे यांची आहे. असे असतानाही त्यांना आतापर्यंत विधानसभेत मिळालेली विजयाची हुलकावणी ही त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नेहमीच बोचणारी राहिली आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT