Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse News : पालकमंत्री दादा भुसे प्रशासनापुढे असहाय का झाले?

Guardian Minister Dada Bhuse look helpless before Police - भुसे म्हणाले, ड्रग्जप्रकरणी कारवाई करा; अन्यथा मी मुख्यमंत्र्यांकडे जाईन

Sampat Devgire

Nashik Drugs Politics : शिवसेनेने अत्यंत आक्रमक होत थेट पालकमंत्री दादा भुसे यांनाच लक्ष्य केले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या भुसे यांनी आज ड्रग्जप्रकरणी बैठक घेतली खरी. मात्र, पोलिसांना जाब विचारणे, इशारा देणे याऐवजी या बैठकीत ते अक्षरशः असहाय दिसल्याने तो चर्चेचा विषय ठरला. (Guardian Minister used a very soft language for Administration on Serious Drugs issue)

पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील ड्रग्जप्रकरणी पोलिस (Police) व प्रशासनासोबत बैठक झाली. त्यात त्यांनी या प्रकरणाने नाशिक (Nashik) शहराला गालबोट लागल्याचे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अवैध धंदे मोडीत काढा

पालकमंत्री हे जिल्ह्याचे असतात. त्यांना शासनाने विशेष अधिकार दिलेले असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व निर्णय आणि त्याची कार्यवाही होते. मात्र, आज पालकमंत्री भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झालेली चर्चा व सूचना पाहता पालकमंत्री अक्षरशः पोलिस यंत्रणेपुढे असहाय दिसले.

त्याचे कारण देत ते म्हणाले, ‘ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असतील, त्याच ठिकाणी ते मोडीत काढावेत. पुन्हा ते उभे राहता काम नयेत. येत्या आठवडाभरात पोलिसांनी केलेल्या कारवाईचे परिणाम दिसले पाहिजेत, अन्यथा हे प्रकरण मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे नेईन.’

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या ‘अमली पदार्थविरोधी जनजागरण चळवळ’ संदर्भातील बैठकीला आमदार डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे यांसह जिल्हाधिकारी जलद शर्मा, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, उपायुक्त प्रशांत बच्छाव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे, पंढरीनाथ थोरे, प्राचार्य हरीश आडके यांसह विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT