Ahilyanagar News : जलसंधारण तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थित आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे. तत्पूर्वी त्यांनी काल जिल्ह्यातील निवडक प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीला मोजक्याच अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं होते.
जिल्ह्यातील अनधिकृत कत्तलखाने, गोमांस विक्री आणि अतिक्रमणांविरोधात कारवाईबाबत ही बैठक होती. अवैध कत्तलखाने अन् अतिक्रमणांविरोधात कारवाई करा, सरकारी जागेत अतिक्रमणे असतील, तर ती पहिली हटवा, ही मोहीम यशस्वी करा, मी खंबीरपणे तुमच्या मागे उभा आहे, अशा शब्दांत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील निवडक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरकर, जिल्हा पोलिस (Police) अधीक्षक राकेश ओला यांच्यासह सर्व प्रांताधिकारी व निवडक अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी जिल्ह्यातील अवैध कत्तलखाने तातडीने बंद करण्याच्या सूचना दिल्या. अनाधिकृत सुरू असणारे गोमांस विक्रीची ठिकाणावर कडक कारवाई करा. वारंवार कारवाई करून, देखील अवैध कत्तलखाने सुरू होत असतील, तर कायद्यातील वेगळ्या तरतुदींचा वापर करा, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील अतिक्रमाणांविरोधात कारवाईच्या सूचना करताना जिल्हा आणि तालुका प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी. कारवाईत कोठेही कमी पडू नका. पालकमंत्री म्हणून कारवाईत मी तुमच्याबरोबर आहे, अशा शब्दात विखेंनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मंत्री विखेंच्या आक्रमक पवित्रा पाहून काही अधिकारी देखील अवाक झाले होते.
मंत्री विखे आजच्या नियोजन विभाग बैठकीपूर्व आढाव घेणार असल्याचे अधिकाऱ्यांना निरोप होते. त्यानुसार सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लगेच जिल्ह्यातील अतिक्रमण, अवैध कत्तलखान्यांविरोधातील मुद्यांवर अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अकोले, कर्जत-जामखेड वगळता अन्य सर्व तालुक्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत निवडक अधिकाऱ्यांना प्रवेश दिला गेला होता. त्यामुळे या बैठकीची चर्चा होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.