Sujay Vikhe : राज ठाकरेंनी मतदारांचा अपमान केलाय, सुजय विखे असं का म्हणाले?

BJP Sujay Vikhe MNS president Raj Thackeray Sangamner Congress Balasaheb Thorat Mumbai : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर केलेल्या भाष्यावर भाजपचे माजी खासदार सुजय विखेंची टीका.
Sujay Vikhe
Sujay VikheSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयावर शंका उपस्थित करताना निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. याचवेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचा संदर्भ दिला.

यावर आता भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. 'राज ठाकरेंनी सुरवातीला माहिती घ्यावी. ते कधीही संगमनेरला आलेले नाही. कालचे वक्तव्य म्हणजे, संगमनेरच्या मतदारांचा अपमान आहे', अशी टीका माजी खासदार सुजय विखे यांनी केली.

राज ठाकरेंनी (Raj Thackeray) कालच्या मुंबईच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत शंका उपस्थित केली. संगमनेरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचा संदर्भ देताना, जो माणूस नऊ वेळा 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतो, तो यावेळी 10 हजार मतांनी पडतो, हे पचनी न पडण्यासारखे आहे, असे विधान केले होते. त्यावर भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Sujay Vikhe
Shambhuraj Desai : मंत्री मुंडे भगवान गडाचे भक्त; मंत्री देसाई म्हणाले, 'महंतांनी त्यांना मोकळ्या...'

भाजपचे (BJP) सुजय विखे म्हणाले, "राज ठाकरेसाहेबांनी कधी संगमनेर दौरा केलेला नाही. माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी संगमनेरचा दौरा करावा. त्यांनी केलेलं वक्तव्य हे संगमनेरच्या मतदारांचा अपमान आहे. राज ठाकरेसाहेब संगमनेरमध्ये आले, तर त्यांच्या लक्षात येईल की, आमची अपेक्षा 40-50 हजार मतांची होती. परंतु आम्ही 10 हजारापर्यंतच पोचू शकलो. संगमनेरची वास्तविकता ते ज्या दिवशी पाहतील, त्या दिवशी ते त्यांचं वक्तव्य मागे घेतील".

Sujay Vikhe
Namdev Shastri Maharaj : मंत्री मुंडेंची पाठराखण, नामदेवशास्त्री महाराज 'न्यायाचार्य' कसे झाले; कुठं घेतलं शिक्षण?

नाना पटोलेंना टोला

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज घटनेवरती बोलावं, अशी मागणी केली आहे. यावर माजी खासदार सुजय विखे म्हणाले, "हिंदूंचा आणि प्रयागराज घटनेचा तसा काही संबंध नाही. हिंदू जागा झालाय हेच, तुम्हाला प्रयागराजमध्ये पाहायला मिळालं".

काँग्रेसला हिंदूंची मतं मिळणारच नाही

'आजपर्यंत कुंभमेळ्यामध्ये एवढी गर्दी कधीच होत नव्हती. फार अति गर्दी झाल्याने प्रशासन एका विशिष्ट प्रमाणामध्ये नियोजन करते. परंतु गर्दी जास्त झाल्याने कुणी असलं, तरी ते नियोजन कोलमडते. घडलेली घटना ही दुर्दैवी आहेच. घडलेल्या दुर्दैवी घटनेवर राजकारण करण्याची प्रथा काँग्रेसची आहे.त्या धोरणांचा विरोध करून काँग्रेसला जर असं वाटत असेल आपण असं बोलल्यानंतर हिंदूंचे मत मिळायला सुरू होतील हा त्यांचा मोठा गैरसमज आहे, असा टोला दोखील सुजय विखेंनी नाना पटोले यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com