Ramraje : रामराजेंबाबत खासदार पाटलांचे मोठे विधान; ‘रामराजे आजतरी राष्ट्रवादीतच; भविष्यात आमच्यासोबत राहतील की नाही, हे...’

NCP MP Nitin Patil Statement : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या साप्ताहीक बैठकीला रामराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित होते. कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी रामराजेंची चर्चाही झाली असेल. पण, ती चर्चा माझ्यासमोर झालेली नाही, त्यामुळे रामराजेंबाबत मी काही सांगू शकत नाही.
Nitin Patil-Ramraje Naik Nimbalkar
Nitin Patil-Ramraje Naik NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Satara, 31 January : राष्ट्रवादी काँग्रेसच्या साप्ताहीक बैठकीत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांना पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या रांगेत स्थान मिळाले होते. त्यामुळे रामराजेंचे पक्षातील स्थान लक्षात येते. राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील यांनीही रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहेत, असे सांगितले खरे पण, ‘ते आमच्यासोबत राहतील की नाही, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा,’ अशी काहींशी संभ्रमाची भूमिकाही खासदार पाटील यांनी मांडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्ह्यातील बैठकीला माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि फलटणचे आमदार सचिन पाटील हे गैरहजर होते. त्याबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर खासदार नितीन पाटील यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले.

खासदार नितीन पाटील (Nitin Patil) म्हणाले, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबाबत माझ्या पातळीवर चर्चा झालेली नाही. त्यांच्याबाबत झालेली चर्चा मला माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या साप्ताहीक बैठकीला रामराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित होते. कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी रामराजेंची चर्चाही झाली असेल. पण, ती चर्चा माझ्यासमोर झालेली नाही, त्यामुळे रामराजेंबाबत मी काही सांगू शकत नाही.

Nitin Patil-Ramraje Naik Nimbalkar
Namedav Shastri : परळीतील भस्मासुराचा जन्मदाता कोण? त्याच्या तोंडाला रक्त कोणी लावलं?; मुंडेंना पाठिंबा देणाऱ्या नामदेवशास्त्रींना महाजनांचे परखड सवाल

रामराजे नाईक निंबाळकर हे आज तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. आगामी काळात ते आमच्यासोबत राहतील का नाही, याबाबतचा प्रश्न त्यांना विचारण्यात यावा, असेही खासदार नितीन पाटील यांनी स्पष्ट केले.

Nitin Patil-Ramraje Naik Nimbalkar
Solapur Politic's : नवख्या राजू खरेंनी दोन 'मालकां'ना एकाच वेळी शिंगावर घेतले...

फलटणचे आमदार सचिन पाटील हे भाजपसोबत काम करीत असल्याच्या प्रश्नावर खासदार पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सातारा जिल्ह्यातील सातारा आणि वाई या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. या दोन्ही जागांवर पक्षाचे आमदार निवडून आले आहेत. फलटणचे सचिन पाटील हे सुरुवातीला भाजपमध्ये होते. मात्र, जागा वाटपात फलटण राष्ट्रवादीकडे आल्याने सचिन पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवली. त्यामुळे सचिन पाटील हे आमचेच आहेत, असेही नितीन पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com