Gulabrao Patil News: सहकारात राजकीय पक्ष बाजूला ठेवायचा असतो. जळगाव जिल्हा बँकेत सत्तेसाठी नेत्यांनी अशीच युती केली आहे. या सत्ताधारी संचालकांचे निर्णय मात्र आता चांगलेच राजकीय वादात सापडले आहेत.
जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी बँकेची दगडी इमारत विक्रीस काढली आहे. बँकेचा ऐतिहासिक वारसा म्हणून सभासद या इमारतीकडे पाहतात. त्यामुळे सत्ताधारी संचालकांच्या या निर्णयाला वेगळाच 'वास' येतो आहे.
विविध नेत्यांनी जिल्हा बँकेत या निर्णयाला कडाडून विरोध केला. माजी मंत्री एकनाथ खडसे त्यात पुढे होते. त्या पाठोपाठ बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील हे त्यात सामील झाले. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
जळगाव जिल्हा बँकेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. जिल्हा बँकेतील सत्ताधारी संचालक बहुमताच्या जोरावर विविध निर्णय घेत आले. मात्र अध्यक्ष संजय पवार राजकीय कोंडीत सापडले आहेत.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपडा बाजार समितीच्या कार्यक्रमात येथील नेत्यांचे कौतुक केले. या संस्था शेतकऱ्यांच्या रक्तातून आणि त्यागातून उभ्या राहिल्या आहेत. चांगले काम काम करून शेतकरी आणि संस्था दोघांचाही विकास करता येतो, असे सांगितले.
जिल्हा बँक नफ्यात आहे. जळगाव जिल्हा बँक म्हणजे 'दगडी बँक' अशी ओळख आहे. या इमारतीचे एक वेगळे अस्तित्व आणि ओळख आहे. मग कशाला ही इमारत विक्रीला काढता? बँकेला कडकी लागली आहे का? असा प्रश्न त्यांनी केला.
जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार मात्र दगडी बँक विक्रीच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. काही सत्ताधारी संचालकही विरोधात जाऊ लागले आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री एकनाथ खडसे या कट्टर राजकीय विरोधकांचे देखील त्यावर एकमत दिसून येते. त्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष पवार यांची चहुबाजूने राजकीय कोंडी होऊ लागली आहे. आगामी काळात हे राजकारण काय वळण घेते, याची उत्सुकता आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.