Bachchu Kadu : बच्चू कडूंनी आमदार-खासदारांचा पगारच काढला, म्हणाले हे शेतकऱ्यापेक्षा गरीब..

Bachchu Kadu On MLA MP Salary : शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर बच्चू कडू हे पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बच्चू कडूंनी शेतकरी मजूर हक्क यात्रेत आमदार-खासदारांचा पाणउताराच केला.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू हे शेतकरी प्रश्न व कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. नाशिकच्या बागलाण तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आयोजित प्रहार शेतकरी हक्क यात्रा दाखल झाली. यावेळी बच्चू कडू यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी यावेळी आमदार-खासदारांचा पगारच काढला.

बच्चू कडू म्हणाले, आमदार-खासदार हे शेतकऱ्यांच्या जिवावर आपली राजकीय पोळी भाजतात. आमदारांचे मानधन आता तीन लाख 50 हजार रुपये झाले आहे, खासदारांच्या पगारातही वाढ झाली आहे. पगारवाढीचा लाभ ते घेत आहेत. पण शेतकऱ्याच्या मालाला आजूनही हमीभाव मिळालेला नाही. त्यामुळे हे आमदार -खासदार शेतकऱ्यापेक्षा सुद्धा गरीब आहेत असा उपरोधिक टोला बच्चू कडूंनी लगावला.

बच्चू कडू शेतकऱ्यांना आवाहन करताना पुढे म्हणाले, आपण शेतकरी म्हणून कधीच एकत्र येत नाही. हाच सर्वात मोठा शोक आहे. राजकीय नेते व पुढारी हे सुद्धा अनेक ठिकाणी एकत्र येतात पण शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी कोणी एकत्र येत नाही. आपण केवळ जाती-धर्माच्या नावाने एकमेकांशी लढत आहोत, पण सरकारसोबत आपल्या हक्कांसाठी लढत नाही असं बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu
Gulabrao Patil : भाजप-राष्ट्रवादी दोन्ही गोंधळले ! गुलाबरावांनी नेमका कोणता माजी आमदार गळाला लावलाय?

बच्चू कडू म्हणाले नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा पिकतो. जोपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी एकत्र येत नाही आणि मुंबई दिल्लीवाल्यांना घडा शिकवत नाही तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही. नाफेड' ही संस्था शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नव्हे तर त्यांच्या मरणासाठी आहे. कांदा उत्पादक शेतकरी मरत आहेत, तरीही कॅबिनेटने आजवर एकही बैठक घेतली नाही असा हल्लाबोल कडूंनी केला.

Bachchu Kadu
Eknath Shinde : भाजप सुद्धा कान लावून बसलाय, एकनाथ शिंदे शिवसेना नेत्यांना काय मंत्र देणार?

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी शेवटपर्यंत लढत राहील. माझा लढा कधीही थांबणार नाही. माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल झाले आहेत तरीही मी थांबणार नाही. यावेळी बच्चू कडू यांनी २८ ऑक्टोबरला नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा, सगळ्यांनी ट्रॅक्टरसह नागपूर गाठा असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com