Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil : जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या दुष्काळ दौऱ्यात फरार आरोपी ; रोहिणी खडसेंच्या आरोपांनी खळबळ

Rohini Khadse’s Allegations During Gulabrao Patil’s Drought Visit : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकताच दुष्काळ पाहणी दौरा केला. त्यावरुन रोहिणी खडसेंनी गंभीर आरोप केले.

Ganesh Sonawane

Gulabrao Patil drought visit : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात नुकताच दुष्काळ पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासोबत एका गुन्ह्यातील फरार आरोपी सहभागी झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केला आहे. पोलिस असतानाही तो आरोपी तिथे वावरत होता असाही दावा रोहिणी खडसेंनी केला.

ज्याचा जामीन कोर्टाने दोनवेळा फेटाळला आहे. पोलिस ज्याला अनेक दिवसांपासून शोधत आहेत. असा आरोपी पालकमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात वावरताना दिसत होता. रोहिणी खडसे यांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केला, पोलिस तिथे असूनही त्यांनी त्याला अटक केली नाही. ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत, अशा गुन्हेगारांना सरकार पाठिशी घालत आहेत का? असा सवाल रोहिणी खडसेंनी उपस्थितीत केला.

दरम्यान, रोहिणी खडसे यांच्या या आरोपांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एवढ्या गर्दीत कोण आरोपी आहे, कोण शेतकरी आहे, कोण ३०२ आणि कोण ३०७ चा गुन्हा करून आला आहे, हे मला कसं माहित पडेल. शेतकऱ्यांमध्ये कोणी गुंडा घुसला हे मला कसे समजेल? दौऱ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणे हा आपला उद्देश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्यांनी माझ्यावर आरोप केला, त्यांनी हा विचार केला पाहिजे की आम्ही कशासाठी आलो होतो. आम्ही शेतकऱ्यांसाठी आलो होतो. गुंड आमच्याबरोबर फिरावेत म्हणून आलो नव्हतो. पण विरोधकांकडे काही भांडवल राहिलं नाही. दुष्काळ जाहीर होणार नाही म्हणून विरोधक बोंबलत होते. पण दुष्काळ जाहीर झाला, आता दुष्काळ पाहणी दौऱ्यातील गर्दीत गुंड होते असे वेगळे आरोप केले जात असल्याची टीका गुलाबरावांनी केली.

गर्दी दिसली नसती तर पालकमंत्र्यांसोबत गर्दी नव्हती अशी टीका झाली असती. मात्र, शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली तर त्यात गुंड होते असा आरोप करताय. कोणी गुंड असेल तर पोलिस प्रशासन ते बघेल. पण, मी काही कुणाला तांदूळ देऊन निमंत्रण दिलं नव्हतं असं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT