Raksha Khadse : ‘तुम्ही तुमचं बघा, आधी आरशात पाहा ! रक्षा खडसेंनी घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या शिवसेना आमदाराला सुनावलं

Raksha Khadse On Chandrakant Patil : जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक खडसे मुक्त झाली पाहीजे असा आपला प्रयत्न असल्याचं विधान शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यावर रक्षा खडसेंनी प्रत्युत्तर दिलं.
 Raksha Khadse On Chandrakant Patil
Raksha KhadseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon District Bank election : जळगाव जिल्ह्यात सध्या आगामी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण पेटलं आहे. खासकरुन महायुतीमधील भाजप व शिवसेनेमध्येच वादाचा कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक खडसे मुक्त झाली पाहीजे असा माझा प्रयत्न असल्याचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांच्या ठरावांवर हरकत घेतली आहे. त्यावरुन वादाची ठिणगी पडली असून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांनी चंद्रकांत पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

जिल्हा बँक खडसे मुक्त करायची हे आमदार चंद्रकांत पाटलांच्या हातात नाही, ते सभासद ठरवतील असं रक्षा खडसेंनी सुनावलं आहे. मला निवडणुकीत उभं राहायची इच्छा असेल तर मी उभं राहीन. मी उभी राहणार किंवा नाही हे चंद्रकांत पाटील ठरवू शकत नाही. त्यांनी त्यांचं बघावं आम्ही आमचं बघतोय, असा टोला रक्षा खडसे यांनी लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घराणेशाहीच्या आरोपांनाही रक्षा खडसेंनी प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या, चंद्रकांत पाटलांचं राजकारणच आम्हाला विरोध करून चालत आलं आहे. आमच्यावर घराणेशाहीचे आरोप करण्याआधी त्यांनी देखील एकदा आरशामध्ये बघावं. अनेक जण एका घरातून जिल्हा बँकेत आहेत, मी त्यांची नावं घेत नाही, पण त्यांचाही हिशोब त्यांनी जिल्ह्यातून घ्यावा, असं रक्षा खडसे म्हणाल्या.

 Raksha Khadse On Chandrakant Patil
Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बॅंक ताब्यात घेण्यासाठी भाजपची व्यूहरचना, आमदार मंगेश चव्हाण यांच्या खांद्यावर धुरा

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसे कुटुंबाला लक्ष्य केलं आहे. मंत्रीपद पण सांभाळायचं आणि जिल्हा बँकेत पण जायचं हे कुठेतरी थांबायला हवा असा टोला त्यांनी रक्षा खडसेंना लगावला. खडसे मुक्त जिल्हा बँक असली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर येथे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

जिल्हा बँकेत ठरवाबाबत मंत्रिपदाचा दुरुपयोग केला जात आहे. बेकायदेशीर ठराव करून जिल्हा बँकेत घुसण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप करत हा प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करू असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

 Raksha Khadse On Chandrakant Patil
Pimpalgaon Bazar Samiti : आमदार गोकुळ गिते, अनिल कदमांनी सभापती दिलीप बनकरांना घेरलं ; वार्षिक सभेत 4 तास खडाजंगी

खडसे गेल्या तीस वर्षापासून जिल्हा बँकेत सहभागी आहेत. आताही चार ठराव खडसे कुटुंबियातले आहेत. कायदा मोडून तोडून सत्तेत सहभागी व्हायचा आणि मलिदा खायचा खडसे कुटुंबियांचा डाव आहे. मागच्यावेळेला मुक्ताई शुगर प्रायव्हेट लिमिटेडसाठी १५० कोटींचं कर्ज घेतलं, आताही तसाच डाव दिसतोय असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. त्यामुळे मी कायदेशीर लढाई लढत असल्याचं सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com