Gulabrao Patil : समोसा असता तर तोही खाल्ला असता; गुलाबरावांकडून बंडू जाधवांची पाठराखण, विरोधकांना सुनावलं...

Gulabrao Patil Defends Sanjay Jadhav Over Dry Fruits Row : संजय जाधव हे काजू-बदाम खाताना दिसल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून मंत्री व अधिकारी टीकेचे धनी बनले. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय जाधवांची पाठराखण करत विरोधकांचा समाचार घेतला.
Water Supply Minister Gulabrao Patil Vs BJP
Water Supply Minister Gulabrao Patil Vs BJP Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर सरकारकडून देखील हालचालींना वेग आला असून कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेडमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली. मात्र, ही बैठक एका वेगळ्याच घटनेवरुन चर्चेत आली. दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव हे काजू-बदाम खाताना दिसल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून मंत्री व अधिकारी टीकेचे धनी बनले. त्यातच आता शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

जळगावात माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी याविषावर भाष्य केलं. गुलाबरावांनी बंडू जाधव यांची एकप्रकारे पाठराखण केली आहे. गुलाबराव म्हणाले, टेबलावर जे आले ते खाल्ले. समोसा आला असता, तर तोही खाल्ला असता. इतकाच आक्षेप असेल, तर यापुढे आमदार घरून पाण्याची बाटली आणतील, पण शेतकऱ्यांचा घास हिरावणारे आम्ही नव्हे, तर त्यांच्या मुखात घास देणारे आम्ही आहोत अशा शब्दांत गुलाबरावांनी विरोधकांचा समाचार घेतला.

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असा निरर्थक विषय समोर आला. तीन ते चार तास चालणाऱ्या प्रदीर्घ बैठकीत भूक लागणे स्वाभाविक आहे. गेल्या २५ वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना शासकीय शिष्टाचारानुसार टेबलावर जे दिले जाते, तेच आमदारांनी खाल्ले. यात शेतकऱ्यांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. शेतकऱ्यांचे डोके भडकवण्याचे विरोधकांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. शेतकरी आमचे दैवत आहे, असे गुलाबरावांनी स्पष्ट केले.

Water Supply Minister Gulabrao Patil Vs BJP
Gulabrao Patil News : शिंदेंचा पक्ष तीन-चार वर्षांचं बाळ, कोण हिणवतय..? मंत्री गुलाबराव पाटलांनी घेतला समाचार

सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार तत्पर आहे. जास्तीत जास्त मदत आम्ही शेतकऱ्यांना मिळवून देऊ. नुकसानीचे योग्य मूल्यांकन होण्यासाठी आणि अचूक मदत पोहोचवण्यासाठी आधी पंचनामे होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दररोज आढावा घेतला जात आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी केली जाईल. दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन पूर्णपणे सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं.

Water Supply Minister Gulabrao Patil Vs BJP
Anil Kadam : अनिल कदमांच्या 'कदमांना' नवी दिशा? बाप्पाच्या आरतीला दादा भुसे अन् निफाडमध्ये पुन्हा खलबतं

गुलाबरावांनी विरोधकांनाही खडसावलं, ते म्हणाले आमचे ७५ टक्के आयुष्य विरोधी बाकांवर आणि सरकारविरोधात लढण्यात गेलं आहे. त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांचे दुःख माहिती आहे. विरोधकांनी ते आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आधीच्या काळात दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा असताना, आमच्या सरकारने नियम गुंडाळून ठेवत तीन हेक्टरपर्यंत भरपाई दिली, दोन ते तीन पट वाढीव मदत शेतकऱ्यांच्या पदरात पाडली. मागणी नसतानाही २०१९ पासून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com