Gulabrao Patil, Minister Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil: गुलाबराव यांनी कार्यकर्त्यांकडे मागितले एवढे दिवस...

Gulabrao Patil politics, Eknath Shinde Group's Minister Gulabrao Patil says re-elect me-पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरू केली मतदारसंघात निवडणुकीची चाचपणी

Sampat Devgire

Gulabrao Patil news: सर्वच आमदार, मंत्र्यांना आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे मतदारसंघात कार्यकर्त्यांना चांगलाच भाव आला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडे एक वेगळीच मागणी केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदारसंघात बैठकांचा धडाका लावला आहे. त्यांनी नुकतीच अजिंठा विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी अक्षरशः दिवसा गणिक राजकीय गणित मांडले.

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांकडे एक वेगळी मागणी केली. निवडणुकीसाठी ९० दिवस देण्याची विनंती त्यांनी केली.आगामी निवडणूक किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी कार्यकर्त्यांना पटवून दिले. या मागणीमुळे कार्यकर्त्यांना ही निवडणुकीसाठी उत्साह आला आहे.

यावेळी मंत्री पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षात महायुतीचे सरकार राज्यात सत्तेत आहे. या सरकारमध्ये मी मंत्री आहे. मंत्री म्हणून मी माझी पूर्ण कार्यक्षमता पणाला लावली. जनतेचे प्रश्न सोडवले.

जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी पोहोचवले. आता आगामी निवडणुकीत आपल्याला महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत आणायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना मनावर घ्यावे लागेल. तसे झाले तरच ही निवडणूक आपल्याला जिंकता येईल.

मंत्री पाटील म्हणाले, मी गेल्या पाच वर्षात १०३५ दिवस प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहिलो. जनतेचे प्रश्न सोडवले आहेत.

या १०३५ दिवसाच्या कामाबाबत मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांकडे एक अपेक्षा व्यक्त केली. ते म्हणाले, आता तुम्ही मला तुमचे फक्त ९० दिवस द्या. या नव्वद दिवसात आपल्याला जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात आणि गावात जाऊन प्रचार करावा लागेल.

जळगाव ग्रामीण मतदार संघात आपल्याला लीड हवा आहे. जीवाला जीव देणारे कार्यकर्ते येथे आहेत. त्यामुळे कोणीही गाफील राहू नये. प्रचार कसा करावा, याचे अतिशय बारीक नियोजन आपण केले आहे, असेही मंत्री पाटील म्हणाले.

निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने झटले पाहिजे. निवडणूकीसाठी सूक्ष्म नियोजन करावे लागेल. नियोजनबद्ध काम केले तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाला विजयापासून कोणीही रोखू शकत नाही.

मतदारांचा, मतदारसंघाचा आणि परिसराचा हमखास विकास होईल हा माझा शब्द आहे. मंत्री पाटील यांनी आपल्या कार्यकाळातील प्रत्येक दिवसाचा हिशेब यावेळी मांडला. त्यामुळे ही बैठक या वेगळ्या नियोजनाच्या चर्चेमुळे कार्यकर्त्यांच्याही चर्चेचा विषय ठरले.

यावेळी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष नरेश पाटील, महिला आघाडीचे अध्यक्ष सरिता कोल्हे- माळी, शिवराज पाटील, अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, शिवराज पाटील, पी. एम. पाटील, विलास महाजन, पप्पू भावे यांनीही विविध सूचना केल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT