Uddhav Thackrey Politics: उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला धक्का, वसंत गिते यांनी सुरू केला प्रचार!

Uddhav Thackeray politics, Shiv Sena shocks Congress, directly announced candidates for Nashik centre-काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या नाशिक मध्य मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाने थेट आपले उमेदवारच जाहीर केले आहेत.
Vasant Gite, Shivsena.
Vasant Gite, Shivsena.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena Vs Congress: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाचपडणाऱ्या काँग्रेसला काल मोठा धक्का बसला. नाशिक शहरातील दोन्ही मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाने आपला दावा ठोकला आहे. नाशिक मध्य मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गिते यांनी प्रचाराला सुरवात केली.

काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद नाशिक शहरात तोळा मासा आहे. या पक्षाची सर्व दारोमदार प्रामुख्याने नाशिक मध्य या मतदारसंघावर आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाने काल एक अनपेक्षित खेळी केली. या मतदारसंघातील आपला उमेदवार जाहीर केला.

शिवसेनेच्या नेत्यांनी काल एक बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातून पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर बडगुजर आणि नाशिक मध्य मतदारसंघातून माजी आमदार वसंत गीते हे उमेदवार असतील. पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकमताने हा ठराव केला.

हा ठराव वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लागावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत स्पष्ट संकेत मिळाले आहेत. वरिष्ठ्यांच्या ग्रीन सिग्नल शिवाय हे शक्य झाले नसते, हे स्पष्टच आहे.

Vasant Gite, Shivsena.
Manoj jarange Patil: जरांगे पाटील घेणार सत्ताधाऱ्यांचा समाचार, कार्यकर्ते झाले रिचार्ज!

शिवसेना ठाकरे गट कोणतीही वाट न पाहता थेट जनतेत जाऊन भाजप विरोधात लढा देण्यास सज्ज झाली आहे. असे यावेळी महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी स्पष्ट केले. या घोषणेने परस्परांतच झगडणाऱ्या काँग्रेसच्या इच्छुक आणि पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. विशेषतः नाशिक मध्य मतदारसंघात अल्पसंख्यांक मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे काँग्रेसच्या इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. या मतदारसंघात काँग्रेस कडून प्रदेश सरचिटणीस राहुल दिवे यांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली आहे. हनीफ बशीर, शहराध्यक्ष आकाश छाजेड आणि डॉ हेमलता पाटील हे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.

महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असेल सध्या नाशिक शहरात चार मतदारसंघ आहेत. यातील देवळाली हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे राहील अशी स्थिती आहे.

Vasant Gite, Shivsena.
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजितदादांना मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

नाशिक पूर्व मतदारसंघावर देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेच दावा केला आहे. देवळाली वगळता उर्वरित तिन्ही मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत. देवळाली येथील आमदार सरोज अहिरे यांनी शरदचंद्र पवार पक्षाशी काडीमोड घेतलेला आहे. त्यांनी अजित पवार गटाला साथ दिली होती.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष कोणत्या जागांवर उमेदवार देणार आणि त्यासाठी त्याची किती तयारी आहे, हे गुलदस्त्यातच आहे. अशा स्थितीत शिवसेना ठाकरे गटाने मात्र गेले सहा महिने देवळाली, नाशिक मध्य आणि पश्चिम या तिन्ही मतदारसंघात जोरदार तयारी केली आहे.

आता उद्धव ठाकरे गटाने दोन मतदारसंघात थेट उमेदवार जाहीर केले. काँग्रेस पक्षात मात्र स्थानिक नेत्यांमध्ये देखील प्रचंड विसंवाद आहे. उमेदवार कोण यावर एकमत होणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे ठाकरे गटाने थेट उमेदवार जाहीर करून काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. त्यातून स्थानिक नेते अद्यापही सावरलेले दिसत नाहीत. यावर काँग्रेस पक्षाचे नेते काय भूमिका घेतात? याची उत्सुकता आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com