Indurikar Maharaj Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Indurikar Maharaj News: इंदुरीकर महाराज पोलिसांना सापडेनात; पोलिसांचा न्यायालयात रिपोर्ट

Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराज नेमके कुठे गेले, याची चर्चा आता रंगली आहे.

Ganesh Thombare

Ahmednagar News: गर्भधारणा पूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायदा (पीसी-पीएनडीटी) या कायद्यानुसार कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावर दाखल गुन्ह्याची शुक्रवारी संगमनेरच्या प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्यासाठी इंदुरीकर महाराज यांना समन्स काढण्यात आले होते.

इंदुरीकर महाराज न्यायालयात हजर राहणार, अशी चर्चा होती. मात्र, समन्स बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांना इंदुरीकर महाराज सापडलेच नाहीत, असा रिपोर्ट संगमनेर ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात सादर केला. त्यामुळे इंदुरीकर महाराज नेमके कुठे गेले, याची चर्चा आता रंगली आहे.

संगमनेर ग्रामीण पोलिसांचा हा रिपोर्ट पोलिस कर्मचारी सचिन उगले यांनी न्यायालयासमोर सादर केल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्ता तथा फिर्यादी वकील रंजना गवांदे यांनी दिली. आता पुढची सुनावणी 8 नोव्हेंबरला होणार आहे.

अपत्य प्राप्तीसंदर्भात फेब्रुवारी 2020 मध्ये इंदुरीकर महाराज यांनी एक विधान केले होते. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. यावरून इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात जुलै 2020 मध्ये पीसी-पीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.

संगमनेर सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांची या गुन्ह्यातून मुक्तता केली होती. मात्र, यावर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. उच्च न्यायालयाने खटला चालवण्याचा आदेश दिला. यावर इंदुरीकर महाराज यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. इंदुरीकर महाराजांचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आणि खटला चालवण्याचा आदेश दिला.

यावर संगमनेर प्रथम वर्ग न्यायालयात आज सुनावणी होणार होती. इंदुरीकर महाराज यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते, पण या समन्सवर संगमनेर पोलिसांनी आज न्यायालयात रिपोर्ट सादर केला. यात इंदुरीकर महाराज सापडत नसल्याचे म्हटले आहे. फिर्यादी रंजना गंवादे आणि अशोक गंवादे न्यायालयात हजर होते.

इंदुरीकर महाराजांनी काय विधान केलं होतं ?

इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून अपत्य प्राप्तीवर सम-विषम तारखांवर भाष्य केले होते. "स्त्री-पुरुषाचा संग जर सम तिथीला झाला तर मुलगा होतो आणि जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते", असे विधान एका कीर्तनात बोलताना इंदुरीकर महाराजांनी केलं होतं.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT